ICC New Rules  
IPL

ICC New Rules : फील्ड अंपायरची 'मनमानी' आता बंद! WTC फायनलपूर्वी ICCने बदलले 3 मोठे नियम

Kiran Mahanavar

ICC New Rules : गेल्या काही वर्षांत, आपण अनेकदा पाहिले आहे की आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान सॉफ्ट सिग्नलमुळे अनेक निर्णयवर वाद विवाद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीसीने आता मोठे पाऊल उचलले आहे. सॉफ्ट सिग्नल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचा काढून टाकला जात आहे. पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने या नवीन बदलाची सुरुवात होईल.

7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत. इंग्लंडमधील लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना नवीन बदलांची माहिती देण्यात आली आहे. क्रिकबझच्या बातमीनुसार, आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची या बदलात महत्त्वाची भूमिका आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता.

आयसीसीच्या नियमांनुसार, सॉफ्ट सिग्नल ही अशी परिस्थिती आहे जिथे मैदानी पंच झेल किंवा अन्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाकडे जातात. सर्व व्हिडीओ आणि कॅमेरा अँगल बघूनही थर्ड अंपायरचे समाधान होत नाही, त्यावेळीस मग ते फील्ड अंपायरचे मत घेतात. जर मैदानी पंचाने प्रथम फलंदाजाला बाद घोषित केले असेल, तर मैदानी पंचाचा 'सॉफ्ट सिग्नल' निर्णय मानला जातो. अनेकवेळा क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय आयसीसीने आणखी दोन मोठे बदल केले आहेत. कमी प्रकाशामुळे कसोटी सामने रद्द करण्यात आले. मात्र आता असे होणार नाही. वेळेआधी कोणत्याही कारणास्तव रोषणाई कमी झाल्यास फ्लड लाइटचा वापर केला जाईल. याशिवाय एकमेव सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oracle Layoff: सकाळी 6 वाजताच 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं! 109 अब्ज डॉलरचे कर्ज तरी आज शेअर्स 6% वाढले; कारण काय?

Mumbai Ambegaon NCP felicitation: मुंबईत आंबेगाव तालुक्यासह राज्यातील नवनिर्वाचित स्थानिक स्वराज्य लोकप्रतिनिधींचा गौरव, शशिकांत शिंदे व देवदत्त निकम उपस्थित

Nanded वारकरी परिषदेच्या बैठकीनंतर घरी जाताना हायवा ट्रकने उडवलं. प्रसिद्ध किर्तनकाराचा जागीच मृत्यू

Kinwat Crop Damage: वादळी वारा-पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! किनवट तालुक्यातील ज्वारी पीक व आंबा बागेचे नुकसान, भरपाईची मागणी!

Latur News: बोधेनगराला आता पिवळ्या पाण्याची शिक्षा; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक मात्र झाले त्रस्त

SCROLL FOR NEXT