Ajinkya Rahane may get Kolkata Knight Riders Captaincy Jhanvi Mehta Hinted  esakal
IPL

IPL 2022 Auction: रहाणेला मिळणार पुन्हा कर्णधारपद? जान्हवीने दिली हिंट

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : आयपीएल मेगा लिलावाचा (IPL 2022 Auction) दुसरा आणि अखेरच्या दिवस समाप्तीकडे झुकला आहे. लिलावात भाग घेतलेला प्रत्येक संघ आपला खेळाडूंचा कोटा पूर्ण करण्याच्या जवळ पोहचला आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) एक मालक जान्हवी मेहताने (Jhanvi Mehta) ब्रेक दरम्यान एक मोठी हिंट दिली. जान्हवी मेहताच्या केकेआरने दुसऱ्या दिवशी पहिला खेळाडू विकत घेतला तो म्हणजे अजिंक्य रहाणे. (Ajinkya Rahane) केकेआरने रहाणेला बेस प्राईस 1 कोटीलाच खरेदी केले. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तसेही त्याचे भारतीय कसोटी संघातील स्थान गेल्यात जमा आहे. (Ajinkya Rahane may get Kolkata Knight Riders Captaincy Jhanvi Mehta Hinted)

मात्र यंदाची आयपीएल (IPL 2022) त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. केकेआरची (KKR) मालक जान्हवी मेहताने तरी रोख तसाच दिसतो. जान्हवी मेहताने केकेआरने अजिंक्य रहाणेला संघात का घेतले याचे कारण सांगितले. ती म्हणाली की, 'अजिंक्य रहाणे हा अनुभवी खेळाडू आहे. तसेच तो सलामीला येत एक अँकर इनिंग देखील खेळू शकतो. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व देखील केले आहे. त्याचा फायदा देखील संघाला होईल.' जान्हवी मेहताच्या एकंदर वक्तव्यावरून केकेआर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्व कौशल्याचा फायदा करून घेणार असल्याचे दिसते. कारण केकेआरने आंद्रे रसेल, सुनिल नरेन आणि वरूण चक्रवर्तीला रिटेन केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कर्णधार मटेरियल फार खेळाडू नाहीत.

अजिंक्य रहाणेला केकेआरची कॅप्टन्सी (Ajinkya Rahane KKR Captaincy) मिळते का? याच्या जोरावर तो पुन्हा भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी आपली दावेदारी सादर करण्यात यशस्वी होणार का? हे येणारा काळच ठरवणार आहे. अजिंक्य रहाणे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यावरून चर्चेत होता. त्याने ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका विजयाचे श्रेय दुसऱ्यानेच लाटल्याचे वक्तव्य केले होते. याचबरोबर त्याने वनडे संघातून अचानक वगळल्याने मॅच प्रॅक्टिसवर परिणाम झाला. त्याचा परिणाम कसोटी क्रिकेटमधील धावांवर देखील झाल्याचे तो बोलला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

SCROLL FOR NEXT