Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad  Sakal
IPL

CSK vs KKR : विदर्भकराचा भेदक मारा, पुणेकराच्या पदरी भोपळा

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Chennai vs Kolkata 1st Match : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील लढतीने यंदाच्या आयपीएल सामन्याला सुरुवात झालीये. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उमेश यादवने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत कोलकाताला पहिल्याच ओव्हरमध्ये दणका दिला. गत हंगामातील ऑरेंज कॅप विजेता आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतूराज गायकवाडला त्याने खातेही उघडू दिले नाही.

ऋतूराज गायकवाडचे (Ruturaj Gaikwad) कोलकाता विरुद्धचे रेकॉर्ड कमालीचे आहे. त्याने चार सामन्यात 52 च्या सरासरीनं 208 धावा कुटल्या आहेत. यात 12 षटकार आणि 18 चौकारांचाही समावेश आहे. त्याचे हे रेकॉर्ड बघता सलामीच्या लढतीत त्याच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा होती. पण कोलकाताकडून खेळणाऱ्या विदर्भाच्या पठ्ठ्याकडून पुणेकराला स्वस्तात आटोपले. पहिल्याच षटकात उमेश यादवने (UmeshYadav) त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

चेन्नईचा संघ धोनीसह मैदानात उतरला असला तरी यंदाच्या हंगामात संघाच्या नेतृत्वाची धूराही रविंद्र जडेजाच्या खांद्यावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली धमक दाखवलेला चेन्नईचा संघ त्याच्या नेतृत्वाखाली कशी सुरुवात करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केलेल्या श्रेयस अय्यरवर कोलकाताने कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी करुन दाखवली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोलकाताकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. सलामीच्या लढतीत भारतीय संघातील दोन स्टार पैकी कोणत्या खेळा़डूचा संघ विजय सलामी देणार हे पाहणे रंजक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT