IPL

IPL 2022 : नवे संघ आज आमनेसामने; पंड्या बंधू एकमेकांविरुद्ध

गुजरातच्या तुलनेत लखनौकडे अधिक अष्टपैलू खेळाडू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बहुचर्चित गुजरात आणि लखनौ या दोन नव्या संघांची आयपीएलमधील पहिली लढत उद्या एकमेकांविरुद्ध होत आहे. दोन्ही संघातील बहुतांश खेळाडूंकडे आयपीएलचा अनुभव असला, तरी नव्या संघातून खेळताना प्रत्येकाचा कस लागणार आहे.

गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या; तर लखनौ संघाचे कर्णधारपद केएल राहुल करणार आहे. या दोघांकडे आयपीएल खेळण्याचा मोठा अनुभव आहे. राहुलने पंजाबचे नेतृत्व केलेले आहे; तर हार्दिक प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. मुळात हार्दिक गोलंदाजी करणार का, हा प्रश्नही तेवढाच मोलाचा ठरणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे आणि या स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा मोठा अनुभव हार्दिकच्या बाजूने आहे.

रशीद खान वि. बिश्नोई

गुजरात संघाकडे विख्यात लेगस्पिनर रशीद खान आहे. आत्तापर्यंत हैदरबाद संघातून खेळलेला रशीद खान कोणत्याही संघाला भारी पडू शकतो; तर लखनौकडे भारताचे आशास्थान असलेली रवी विश्नोई आहे. हे दोन्ही लेगस्पिनर उद्या एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल.

पंड्या बंधू एकमेकांविरुद्ध

हार्दिक आणि कृणाल पंड्या यांची आयपीएलमधील कारकीर्द मुंबई इंडियन्स संघातून घडली आहे. प्रथमच ते उद्या एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

लखनौचा संघ समतोल

गौतम गंभीर मेंटॉर असलेल्या लखनौ संघाने लिलावात संघ निवड करताना अष्टपैलू खेळाडूंवर भर दिला होता. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्यांचा संघ समतोल वाटत आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अनुपलब्ध असले, तरी उद्याच्या सामन्यासाठी त्यांच्याकडे चांगले पर्याय आहेत. मात्र परदेशी खेळाडूंमध्ये ते कोणाची निवड करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT