IPL 2022 Points Table KKR is ready Orange Cap And Purple Cap After KKR vs PBKS Match
IPL 2022 Points Table KKR is ready Orange Cap And Purple Cap After KKR vs PBKS Match  sakal
IPL

KKR है तयार! Points Table सह ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सीझनमध्ये, शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना झाला. यामध्ये पंजाब संघाने दिलेले 138 धावांचे लक्ष्य कोलकाता संघाने 14.3 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. विजयासह केकेआरला गुणतालिकेत फायदा झाला. या हंगामात केकेआरने तीन पैकी दुसरा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. 4 गुण आणि नेट-रेट देखील 0.843 आहे. तर पंजाब किंग्जचा दोन सामन्यातील हा पहिलाच पराभव आहे. हा संघ 2 गुणांसह -1.183 नेट्रेटने 7 व्या क्रमांकावर आहे.

पॉइंट टेबल व्यतिरिक्त, केकेआरने ऑरेंज-पर्पल कॅपही आपल्या ताब्यात घेतली आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने संघाच्या विजयात चमकदार कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने पंजाब किंग्जला पूर्णपणे हल्ला केला. याचा फायदा असा झाला की दोघांनी ऑरेंज-पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.

IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)

  • आंद्रे रसेल - ३ सामने, ९५ धावा

  • फाफ डू प्लेसिस - 2 सामने, 93 धावा

  • इशान किशन - 1 सामना, 81 धावा

  • रॉबिन उथप्पा - 2 सामने, 78 धावा

IPL 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप)

  • उमेश यादव - 3 सामने, 8 बळी

  • टीम साऊदी - 2 सामने, 5 विकेट्स

  • वानिंदू हसरंगा - 2 सामने, 5 विकेट्स

  • ड्वेन ब्राव्हो - 2 सामने, 4 बळी

आयपीएल 2022 सीझनमध्ये आज दुसरा डबल हेडर खेळला जाणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात दुपारी 3.30 वाजता होणार आहे. तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला जाईल. अशा स्थितीत दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर पॉइंट टेबल आणि ऑरेंज-पर्पल कॅपमध्ये मोठा बदल होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT