IPL 2022 Tickets sold IPL 2022 Tickets sold
IPL

मोठी बातमी : IPL २०२२ Tickets विक्री या दिवशीपासून

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. लीगचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात शनिवारी (ता. २६) मार्च रोजी होणार आहे. अशात लीगच्या सामन्यांच्या तिकिटांबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

साधारणपणे सामन्याच्या किमान दोन आठवडे आधी तिकिटे विक्री केली जातात. मात्र, यावेळी स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे तिकीट विक्रीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. पुण्यासह सर्व ठिकाणी सामन्यांची तिकिटे (Tickets) बुधवारपासून (ता. २३) विक्रीसाठी उपलब्ध झाली पाहिजे, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले. आयपीएलचे (IPL 2022) सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना ऑनलाइन तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत.

स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आसन क्षमतेबाबत बीसीसीआय (BCCI) आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. आयपीएल २०२२ साठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केवळ २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला आहे. तर बीसीसीआयला कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर प्रेक्षकांची आसनक्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे. दर्शक २३ मार्चपासून iplt20.com आणि Bookmyshow.com वर IPL 2022 साठी ऑनलाइन सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT