Virat Kohli Fan Poster of Girlfriend left  ESAKAL
IPL

IPL 2022: विराटमुळे माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडले; बोर्ड घेऊन बॉयफ्रेंड मैदानात

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 च्या हंगामातील (IPL 2022) सहावा सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या रोमहर्षक सामन्यात आरसीबीने 3 विकेट्सनी विजय मिळवला. पहिल्या सामन्यात पराभव झालेल्या आरसीबीने केकेआरविरूद्ध विजय मिळवत आपले विजयाचे खाते उघडले. मात्र संघाचा माजी कर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही.

दरम्यान, विराट कहोलीच्या एका चाहत्याने (Virat Kohli Fan) या सामन्यादरम्यान विराटवरील त्याच्या गर्लफ्रेंडची (Girlfriend) नाराजी पोस्टर (Poster) दाखवून व्यक्त केली. फॅन्सने या पोस्टरवर 'माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली आहे. कारण मी तिच्यापेक्षा जास्त वेळ विराट कोहलीला देतो.' असा मजकूर लिहिला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो कोलकाता आणि बेंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने फक्त 128 धावा केल्या होत्या. आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने भेदक मारा करत 4 तर आकाश दीपने 3 विकेट घेतल्या होत्या. मात्र आरसीबीला देखील 129 धावांचे आव्हान पार करताना दमछाक झाली. त्यांचे 7 फलंदाज यात खर्ची पडले. अखेर शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने अनुभव पणाला लावत आरसीबीला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'गौतम गंभीरच्या आधी, मी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलो असतो, पण...'; VVS Laxman च्या दाव्याने खळबळ; नेमकं तेव्हा काय घडलं?

तुकाराम मुंढेंचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे; अभिनेते परेश रावल यांनी फडणवीसांकडे केली 'खास' मागणी, म्हणाले...

Marathi News Live Updates : NEET-UG पेपर लीक प्रकरण : राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाचा निर्णय पुढे ढकलला; आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

SCROLL FOR NEXT