IPL 2023 ms dhoni chennai super kings will play 10th ipl final check out these states
IPL 2023 ms dhoni chennai super kings will play 10th ipl final check out these states  
IPL

IPL 2023 : …तर धोनीची CSK फायनल खेळणार! 'हा' योगायोग ठरणार महत्वाचा

रोहित कणसे

आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी तीन संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. गुजरातचे सध्या 18 गुण आहेत आणि संघ पहिल्या स्थानावर राहीला. त्याच वेळी, चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी 14-14 सामने खेळले आहेत आणि 17-17 गुणांसह लीग फेरी संपवलीट

मात्र चांगल्या रनरेटच्या जोरावर चेन्नइ दुसऱ्या स्थानावर आहे. लखनऊ संघाने तिसरे स्थान पटकावले. चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत आहे. मात्र, एक विचित्र योगायोग समोर आला आहे, त्यानुसार चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या मोसमातील 10 वे फायनल खेळू शकतो.

प्लेऑफमध्ये सामने कसे खेळले जातात?

लीग राउंडमद्ये टॉपवर राहिलेले चार संघ प्लेऑफ मध्ये पोहचतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या संघांना अंतिम फेरीत जाण्याच्या दोन संधी मिळतात. त्याच वेळी, प्रत्येक सामना हा तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावरील संघासाठी व्हर्च्युअल नॉकआउट असतो.

पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले संघ क्वालिफायर-1 खेळतात, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर खेळतात. क्वालिफायर-1 मधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतो. तर, पराभूत संघाला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघासोबत क्वालिफायर-2 खेळावे लागते. एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा प्रवास संपतो. क्वालिफायर-2 मधील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचतो

2011 मध्ये प्रथमच आयपीएलमध्ये प्लेऑफ फॉर्मेट आला होता, ज्यानुसार क्वालिफायर्सच्या मदतीनेच फायनलमधील संघ ठरतात. तेव्हापासून आतापर्यंत 12 हंगामात लीग राऊंडमध्ये गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला संघ निश्चितपणे अंतिम फेरीत पोहोचला आहे.

2011 मध्ये चेन्नई, 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, 2013 मध्ये मुंबई इंडियन्स, 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स, 2015 मध्ये मुंबई इंडियन्स, 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 2018 आणि 2019 मध्ये CSK, दिल्ली कॅपिटल 2020, 202१ मध्ये CSK आणि 2022 मध्ये राजस्थानचा संघ दुसरा क्रमांक मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

या स्थितीत यंदाच्या मोसमात चेन्नई संघाने लीग राऊंडमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता हा संघ अंतिम फेरीत पोहोचतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, योगायोगानुसार धोनी अंतिम फेरीत जाण्याची शक्यता दाट आहे.

महत्वाचे म्हणजे 2011 (CSK), 2012 (KKR), 2013 (MI), 2014 (KKR), 2015 (MI), 2018 (CSK) आणि 2021 (CSK) हे संघ लीग राऊंडनंतर दुसऱ्या स्थानावर राहीलेले हे संघ विजेते राहीले. त्यामुळे CSK ला चांगला संधी आहे. चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत सर्वात यशस्वी संघ आहे.

संघाने आतापर्यंत 14 पैकी 12 हंगामात प्लेऑफ गाठण्यात यश मिळवले आहे. चेन्नईला 2016 आणि 2017 मध्ये निलंबित करण्यात आले होते. याशिवाय 2020 आणि 2022 मध्ये चेन्नई लीग स्टेजमधून बाहेर पडली. 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये संघ चॅम्पियन बनला, तर 2008, 2012, 2013, 2015 आणि 2019 मध्ये संघ उपविजेता ठरला.

चेन्नईने हे सर्व यश धोनीच्या नेतृत्वाखालीच मिळवले आहे. धोनीने 2008 पासून 233 सामन्यात चेन्नईचे नेतृत्व केले असून 140 जिंकले आहेत. 2009 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. एक सामना बरोबरीत संपला आणि दोनचा निकाल लागला नाही. यामध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगच्या सामन्यांचाही समावेश आहे. एकट्या आयपीएलमध्ये धोनीने 224 सामन्यांमध्ये CSK आणि पुण्याचे नेतृत्व केले असून 131 सामने जिंकले आहेत. त्यांच्या संघाला 91 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. दोन सामने अनिर्णीत राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT