IPL 2023 New Rules
IPL 2023 New Rules 
IPL

IPL 2023 New Rule: प्रत्येक संघाला 90 मिनिटांत टाकावी लागणार 20 षटके! नाहीतर होईल मोठी शिक्षा

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 New Rule : काही तासांनंतर आयपीएलच्या 16व्या हंगामाला धुमधडाक्यात सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा पहिला सामना आज 31 मार्च होणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील 16व्या मोसमातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा 16वा सीझन हा खास असणार आहे. आयपीएलला अधिक रोमांचक बनवण्यासाठी त्यात पाच नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटचा नियमही लागू आहे. जर संघ निर्धारित वेळेत षटक टाकू शकला नाही तर त्याला शिक्षा होणार आहे.

आयपीएल सामन्यांदरम्यान गोलंदाजी करणाऱ्या संघाला 90 मिनिटांत सर्व 20 षटके टाकावी लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला तसे करता आले नाही, तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणे कट वेळेनंतर सर्व षटके टाकली जातील, या दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे फक्त चार खेळाडू सीमारेषेवर राहतील.

पॉवरप्लेनंतर 5 खेळाडूंना सीमारेषेवर ठेवले जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारासाठी हा नियम डोकेदुखी ठरू शकतो. अशा स्थितीत कर्णधार आपल्या सर्व गोलंदाजांकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करतील अशी अपेक्षा असेल.

IPL 2023 मध्ये 5 नवीन नियम

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये एकूण पाच नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रभावशाली खेळाडू नियम, नाणेफेकीनंतर 11 खेळण्याची घोषणा, वाईड आणि नो-बॉलसाठी डीआरएस, चुकीच्या हालचालीवर डेड बॉल आणि स्लो रेटचा नियम यांचा समावेश आहे.

पण या सर्व नियमांमध्ये चर्चेचा विषय आहे तो इम्पॅक्ट प्लेयर नियम. हा नियम लागू झाल्याने 11 ऐवजी 12 खेळाडू सामन्यात खेळताना दिसणार आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही संघांकडून केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT