Punjab Kings beat Kolkata Knight Riders News Marathi
Punjab Kings beat Kolkata Knight Riders News Marathi sakal
IPL

IPL 2024 KKR Vs PBKS : तांडव! 42 षटकार 37 चौकार अन् 523 धावा.... पंजाबचा विक्रमी विजय, कोलकत्याचा पराभव

Kiran Mahanavar

Punjab Kings beat Kolkata Knight Riders : पंजाब किंग्सने शुक्रवारी टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील विक्रमी विजयाला गवसणी घातली. जॉनी बेअरस्टोच्या नाबाद १०८ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने यजमान कोलकता नाईट रायडर्स संघाचा आठ विकेट राखून धुव्वा उडवला. कोलकताकडून मिळालेल्या २६२ धावांचे आव्हान पंजाबने अवघे दोन विकेट गमावत ओलांडले.

याचसह त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिजविरुद्ध केलेल्या २५९ धावांच्या विक्रमी पाठलागाला मागे टाकले. आता टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पंजाबच्या नावावर नोंदवला गेला. पंजाबचा हा तिसरा विजय ठरला. कोलकता संघाला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

धावांचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंग (५४ धावा) व जॉनी बेअरस्टो या जोडीने ९३ धावांची भागीदारी करताना पंजाबला दणक्यात सुरुवात करून दिली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर बेअरस्टो याने रायली रुसो (२६ धावा) व शशांक सिंग (नाबाद ६८ धावा) यांच्या साथीने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बेअरस्टोने आपल्या शतकी खेळीत ४८ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व नऊ षटकारांचा पाऊस पाडला.

याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फिल सॉल्ट व सुनील नारायण या सलामी जोडीने १०.१ षटकांत १३८ धावांची खणखणीत भागीदारी रचली. नारायण व सॉल्ट या दोघांनी या भागीदारीत नेत्रदीपक फटके मारले. पंजाबच्या क्षेत्ररक्षकांकडून या लढतीत चुका घडल्या. त्यांच्याकडून झेलही सोडण्यात आले. नारायणने आपला फलंदाजी फॉर्म कायम ठेवला. त्याने ३२ चेंडूंमध्ये नऊ चौकार व चार षटकारांसह ७१ धावांची खेळी साकारली. राहुल चहरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

फिल सॉल्ट व व्यंकटेश अय्यर या जोडीने कोलकता संघाचा धावफलक पुढे नेला. सॉल्टने ३७ चेंडूंमध्ये सहा चौकार व सहा षटकारांसह ७५ धावांची मौल्यवान खेळी केली. सॅम करनच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर (३९ धावा), आंद्रे रसेल (२४ धावा), श्रेयस अय्यर (२८ धावा) यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर कोलकता संघाने २० षटकांत ६ बाद २६१ धावांचा पाऊस पाडला. अर्शदीप सिंगने ४५ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

दृष्टिक्षेपात

- पंजाब किंग्सने टी-२०च्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. याप्रसंगी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या २५९ धावांना मागे टाकत २६२ धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

- पंजाब किंग्स - कोलकता नाईट रायडर्स या लढतीत ४२ षटकारांचा विक्रमी पाऊसही पडला.

- पंजाब किंग्स - कोलकता नाईट रायडर्स या लढतीत दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावांची फटेकबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT