prasidh krishna  Twitter
IPL

IPL Auction : भारतीय गोलंदाजांची हवा; कृष्णाही झाला 'प्रसिद्ध'

सुशांत जाधव

IPL Auction 2022 : टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना चांगली पसंती मिळते. मात्र आता गोलंदाजही आयपीएलसारख्या स्पर्धेत चांगली पसंती मिळवत आहेत. परदेशी गोलंदाजांना मागे टाकत भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या मेगा लिलावात चांगलाच भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. दीपक चाहर, अक्षर पटेल यांनी कोटीच्या घरात जाऊन दुहेरी आकडा गाठला. त्यांच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णानेही विशेष छाप सोडली. राजस्थान रॉयल्सने 10 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. याआधी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चाहरसाठी 14 कोटी मोजले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं हर्षल पटेलला 10.75 कोटीत खरेदी केले.

प्रसिद्ध कृष्णाची मूळ किंमत (बेस प्राईज) 1 कोटी होती. याआधी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसले होते. आगामी आयपीएल हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरेल. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत प्रसिद्धनं लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. या कामगिरीचाही त्याला लिलावात फायदा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

Pune District Yellow Alert : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट; कमाल तापमानात लक्षणीय घट

Vilas Ghule प्रकरण पेटलं! बीडमध्ये गाड्यांची तोडफोड, नेमकं काय घडलं?

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

SCROLL FOR NEXT