कर्णधार रोहित शर्मा sakal
IPL

IPL : आता देशाकडूनही असा फॉर्म कायम ठेव! रोहित शर्मा

शुभमन गिलचे कौतुक करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : शुभमन गिलची झंझावाती शतकी खेळी आयपीएल क्वॉलिफायर-२ लढतीत मुंबई इंडियन्सच्या पराभवास कारणीभूत ठरली, असे मत या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीनंतर व्यक्त केले. त्याच वेळी त्याने युवा सलामीवीराच्या शानदार फॉर्मचेही कौतुक करताना भारतातर्फेही खेळताना तो धडाका कायम राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शुभमन गिलने शुक्रवारी रात्री ६० चेंडूंत धडाकेबाज १२९ धावा केल्या. त्यानंतर मोहित शर्माने (५-१०) डावांत पाच गडी टिपण्याची किमया साधली. या कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला ६२ धावांनी नमवून सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता रविवारी विजेतेपदासाठी त्यांची गाठ चेन्नई सुपर किंग्सशी पडेल.

‘‘शुभमन खरोखर चांगला खेळला. विकेट चांगली होती. त्यांना २०-२५ जादा धावांचा लाभ झाला. सामन्याच्या पहिल्या अर्धानंतर आम्ही सकारात्मक होतो. आम्हाला सारे श्रेय शुभमनला द्यावेच लागेल. आशा करतो, की तो हा फॉर्म असाच कायम राखेल,’’ असे रोहित म्हणाला.

आव्हानाच्या पाठलागात कमी पडलो

सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांच्या भागीदारीमुळे किंचित प्रमाणात आशा बळावल्या होत्या, पण आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने पॉवरप्लेमध्येच सामन्याची सूत्रे गमावल्याचे रोहितने कबूल केले. तो म्हणाला, ‘‘ग्रीन आणि सूर्या यांनी छान फलंदाजी केली, पण आम्ही वाट चुकलो होतो. आम्हाला धडाक्यात सुरुवात करायची होती, सकारात्मक राहायचे होते. आम्ही पॉवरप्लेमध्ये सूत्रे गमावली.

गुजरातप्रमाणे आम्हाला एक फलंदाज हवा होता, जो चांगल्या खेळपट्टीवर आणि मैदानाची सीमारेखा छोटी असताना महत्त्वाच्या टप्प्यावर काहीही घडू शकते अशा वेळी खोलवर खेळू शकला असता. तरीही चांगला खेळ केलेल्या गुजरात टायटन्सला श्रेय द्यायलाच हवे.’’ रोहित म्हणाला, ‘‘किशनची दुखापत अनपेक्षित होती. तो अखेरच्या क्षणी झालेला बदल होता. वेगवेगळ्या वातावरणात आणि परिस्थितीत आम्हाला जुळवून घ्यायला हवे.’’

स्पर्धेतील मोहीम सकारात्मक

मुंबई इंडियन्सला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले, तरीही या मोहिमेतून सकारात्मकतेवर प्राधान्य राहील, असे रोहितने सांगितले.

‘‘हा सामना खेळणे, त्यासाठी पात्रता मिळवणे, येथपर्यंतची मजल खूप मोठी आहे. पुढील मोसमाचा विचार करता फलंदाजी खूप सकारात्मक ठरली. सर्व संघांच्या गोलंदाजीस आव्हान दिले गेले,’’ असे रोहित म्हणाला. मागील सामन्यात खूप छान कामगिरी झाली. यंदा मोसमात टीम डेव्हिड याला वेगळी भूमिका देण्यात आली होती, असेही मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने नमूद केले.

हार्दिकनेही शुभमनची पाठ थोपटली

विजयी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही शुभमन गिलची पाठ थोपटली. फलंदाजी विचारांतील स्पष्टतेमुळेच तो धावांचा रतीब टाकत असल्याचे मत त्याने मांडले. हार्दिक म्हणाला, ‘‘मला वाटतं, त्याच्यापाशी असलेली स्पष्टता आणि आत्मविश्वास विस्मयकारक आहे. आजचा डाव सर्वोत्तमपैकी एक होता. त्याने विनाकारण घाई केली नाही. असे वाटत होते, की कोणी तरी चेंडू फेकत आहे आणि तो मारतोय. आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायजी क्रिकेटमधील तो सुपरस्टार ठरेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT