KKR vs SRH | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: काय सांगता! आयपीएल फायनलमध्ये खेळणार नाहीत टी20 वर्ल्ड कपमधील एकही भारतीय खेळाडू? जाणून घ्या कारण

KKR vs SRH, IPL2024 Final: आयपीएल 2024 मधील अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात रविवारी खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

KKR vs SRH, IPL2024 Final: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत क्वालिफायर-2 सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात शुक्रवारी (24 मे) पार पडला. चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 36 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं.

आता अंतिम लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे. कोलकाताने क्वालिफायर-1 जिंकत अंतिम सामना गाठला होता.

क्वालिफायर-1 मध्ये कोलकाताने हैदराबादलाच पराभूत केलं होतं. त्यामुळे हैदराबाद आता अंतिम सामन्यात त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्नात असेल, तर कोलकाता विजयी लय अंतिम सामन्यातही कायम राखण्यास उत्सुक असतील.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ असे आहेत, ज्या संघात आगामी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 जणांच्या भारतीय टी20 संघातील एकही खेळाडू नाही. केवळ राखीव खेळाडूंमधील एकमेव रिंकु सिंग कोलकाता संघात आहे.

खरंतर प्लेऑफ चालू झाले, तेव्हा 15 जणांच्या भारतीय टी20 संघातील पाच खेळाडू यात व्यस्त होते. यामधील विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होते, तर संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि यशस्वी जैस्वाल हे तीन खेळाडू राजस्थान रॉयल्स संघात होते.

मात्र आता बंगळुरूला एलिमिनेटर सामन्यात आणि राजस्थानला क्वालिफायर-2 मध्ये पराभव स्विकारावा लागल्याने त्यांचे आव्हान संपले आहे.

त्यामुळे, आता अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या कोलकाता आणि हैदराबाद संघात एकही भारतीय संघातील खेळाडू नाही.

शनिवारी भारतीय खेळाडू अमेरिकेला होणार रवाना?

मीडियातील रिपोर्ट्सनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघातील खेळाडूंचा एक गट शनिवारी (25 मे) अमेरिकेसाठी रवाना होईल, तर दुसरा गट आयपीएल 2024 अंतिम सामन्यानंतर रवाना होणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीसाठी भारताचा समावेश अ गटात आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ आहेत.

भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जून रोजी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी 9 जून रोजी आमने-सामने येणार आहेत. भारताचा तिसरा सामना यजमान अमेरिकेविरुद्ध 12 जून रोजी होईल. कॅनडाविरुद्ध भारतीय संघ 15 जून रोजी खेळणार आहे. पहिल्या फेरीतील भारताचे सर्व 4 सामने अमेरिकेत होणार आहेत.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT