Jay Shah | Team India Coach
Jay Shah | Team India CoachSakal

Team India Coach: 'भारतीय संघाच्या कोचसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला BCCI ने प्रस्ताव...', जय शाह यांचा मोठा खुलासा

Jay Shah on India Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. याबाबतच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
Published on

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे पर्यंत आहे. त्यामुळे सध्या या महत्त्वाच्या पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. याबाबतच आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

गेल्या काही दिवसात अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची नावे भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

त्यातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने असा दावा केला होता की भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आली होती. परंतु, त्याची जीवनशैली सध्या त्यासाठी जुळत नसल्याने हा प्रस्ताव त्याने नाकारल्याचे सांगितले होते.

दरम्यान, त्याने हा प्रस्ताव बीसीसीआय किंवा जय शाह यांच्याकडून ठेवण्यात आलेला का, याबाबत मात्र स्पष्ट माहिती दिली नव्हती.

Jay Shah | Team India Coach
WI vs SA: कर्णधार IPL मध्ये बिझी असताना वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का! T20 मालिकेत घेतली आघाडी

आता याबाबत जय शाह यांनी खुलासा केला आहे की बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला प्रशिक्षकपदासाठी विचारणा केलेली नाही.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह यांनी सांगितले की 'मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव दिलेला नाही. याबाबत जे काही मिडिया रिपोर्ट्स येत आहेत, ते सर्व चुकीचे आहेत.

'भारतीय संघासाठी योग्य प्रशिक्षक शोधण्याची प्रक्रिया ही एक सूक्ष्म आणि सखोल आहे. ज्याला भारतीय क्रिकेट प्रणालीची सखोल माहिती आणि समज आहे अशा व्यक्तीच्या शोधात आम्ही आहोत. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आमच्या प्रशिक्षकाला आमच्या देशांतर्गत क्रिकेटचे सखोल ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे.'

Jay Shah | Team India Coach
Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

तसेच जय शाह असेही म्हणाले की भारतीय संघाला प्रशिक्षक असणे ही सन्मानाची गोष्ट आहे. ते म्हणाले, 'जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करतो, तेव्हा भारतीय क्रिकेटचा प्रशिक्षकाच्या भूमिकेपेक्षा इतर काहीही प्रतिष्ठित नसते. जगभरात भारतीय संघाचा मोठा चाहता वर्ग आहे, जे अतुलनीय आहे.'

'आमचा खेळाचा इतिहास, पॅशन यामुळे ही नोकरी जगातील सर्वात लाभ देणारी आहे. ही भूमिका प्रचंड प्रोफेशनल आहे. काही सर्वोत्तम क्रिकेटपटूंना तयार करण्यासाठी आणि प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना आदर्श घालून देण्यासाठी ही भूमिका महत्वाची आहे.'

'अब्जावधी चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान असून बीसीसीआय योग्य उमेदवाराची निवड करेल.'

दरम्यान, आता राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याची उत्सुकचा क्रिकेट चाहत्यांना आहे. द्रविडचा करार जून 2024 पर्यंत आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये द्रविड प्रशिक्षक असणार आहे. पण त्यानंतर भारताला नवा प्रशिक्षक मिळेल.

तसेच बीसीसीआयने माहिती दिली आहे की नव्या प्रशिक्षकाबरोबरचा सुरुवातीचा करार हा साडेतीन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. तसेच तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी एकच मुख्य प्रशिक्षक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com