KKR | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

KKR Celebration: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले.

Pranali Kodre

KKR winner IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकले. कोलकाताने अंतिम सामन्यात रविवारी (२६ मे) सनरायझर्स हैदराबाद संघाला ८ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.

कोलकाता नाईट रायडर्सची हे तिसरे आयपीएल विजेतेपद ठरले. यापूर्वी २०१२ आणि २०१४ साली त्यांनी आयपीएल ट्रॉफी उंचावली होती.

अंतिम सामन्यात हैदराबादने कोलकातासमोर ११४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग कोलकाताने १०.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. कोलकातासाठी विजयी धाव वेंकटेश अय्यरने काढली.

वेंकटेशने विजयी धाव घेताच कोलकाता संघातील सर्व खेळाडू मैदानात धावत आले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. तसेच संघमालक शाहरुख खानने उभे राहत संघाचे कौतुक केले.

यावेळी संघाचा मेंटॉर गौतम गंभीरही संघासह सेलीब्रेशन करताना दिसला. त्याने सुनील नारायणलाही उचलून घेत आनंद सादरा केला.

यावेळी ब्रॉडकास्टरशी बोलताना आंद्रे रसेलला आनंदाश्रू रोखता आले नाहीत. या क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

अंतिम सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्वबाद ११३ धावा केल्या. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या. कोलकाताकडून आंद्र रसेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि हर्षिक राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच वैभव अरोर, सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर ११४ धावांचे लक्ष्य कोलकाताने पूर्ण करताना वेंकटेश अय्यरने २६ चेंडूत सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तसेच रेहमनुल्लाह गुरबाजने ३९ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT