Lasith Malinga Style CSK Matheesha Pathirana  ESAKAL
IPL

मुंबईच्या मलिंगाची झलक सीएसकेच्या मथीशात; VIDEO होतोय तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आयपीएलच्या 62 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 7 विकेट्सनी पराभव केला. आजच्या सामन्यात गुजरातने चेन्नईला 133 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. जरी हा सामना गुजरातने जिंकला असला तरी या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या एका गोलंदाजाचीच चर्चा सुरू आहे. हा गोलंदाज आहे श्रीलंकेचा मथीशा पथिराना (Matheesha Pathirana). आज गुजरातच्या तीन विकेट पडल्या त्यातील मथीशा पथिरानाने दोन विकेट घेतल्या.

मथीशा पथिरानाने आज चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण केले. मथीशा हा 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये सर्वात प्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी श्रीलंकेतून अजून एका मलिंगा (Lasith Malinga) तयार होत आहे अशी चर्चा होती. आज या मलिंगा छाप मथीशाने चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल पदार्पण केले. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल गाजवली होती. आता हा चेन्नईचा 'मलिंगा' कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मथीशाने आपल्या आयपीएलची सुरूवात तरी धडाकेबाज पद्धतीने केली. मथीशाने आपल्या पहिल्याच आयपीएल चेंडूवर शुभमन गिलला पायचीत बाद केले. मथीशाचा पहिलाच चेंडू पाहून लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT