Mayank Yadav
Mayank Yadav esakal
IPL

Mayank Yadav LSG vs PBKS :पदार्पणातच 155.8 kmph! गब्बरच्या धडाक्यावर मयंक यादवच्या वेगाचा उतारा

अनिरुद्ध संकपाळ

Mayank Yadav IPL Debutant LSG vs PBKS : लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं. लखनौनं मोठी धावसंख्या उभारून देखील त्यांच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण शांतच होतं. कृणाल पांड्यानं 43 धावांची धडाकेबाज इनिंग खेळली होती तरी संघातील खेळाडूंच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या.

सर्वांना आश्चर्य वाटत होतं. लखनौनं अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरील आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी टोटल उभारली होती. तरी संघ व्यवस्थापन चिंतेत का होतं...?

याचं उत्तर गब्बर अर्थात शिखर धवन अन् जॉनी बेअरस्टोनं थोड्याच वेळात दिलं. या दोघांनी 11 व्या षटकातच 102 धावांची सलामी ठोकत लखनौचे 12 वाजवले होते. पंजाब हा सामना सहज जिंकणार... अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरील खेळपट्टीनं काळी कात टाकत आता लाल रंग धारण केला होता. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या हंगामात सर्वाधिक लो स्कोरिंग सामने होणारं स्टेडियमवर आता धावांचा पाऊस पडत होता.

पंजाबचा वारू उधलला होता. गब्बरनंही आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. मात्र त्यानंतर स्टँड इन कॅप्टन निकोलस पूरननं आयपीएल पदार्पण करणाऱ्या मयंक यादवच्या हातात चेंडू दिला. या 21 वर्षाच्या पोराची 150 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी करतो अशी ख्याती होती. तशी ख्याती भारतातील अनेक गोलंदाजांची होती. मात्र पुढं त्यांच काय झालं सर्वांना माहितीच आहे.

मात्र हा मयंक यादव वगेळा ठरला. सामना फसला असताना... गब्बर तडाखे देत असताना या पठ्ठानं शॉर्ट ऑफ लेंथचा जबरदस्त वापर करत आपल्या वेगानं पंजाबच्या फलंदाजांच्या मनात टेरर निर्माण केलं. त्यानं आजच्या सामन्यात 155.8 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकून उमरान मलिक, लोकी फर्ग्युसनला पदार्पण करताच आव्हान दिलं.

मयंक यादवनं आधी जॉनी बेअरस्टोचा अडसर दूर केला. त्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर पंजाबची गाडी रुळावरून घसरली. मयंकनं 271 च्या स्ट्राईक रेटनं धावा करणाऱ्या प्रभसिमरनला वेगवान बाऊन्सरनं चकवलं. तोच फंडा जितेश शर्माच्याविरूद्ध वापरून मयंकनं पंजाबचा अजून एक शिलेदार गार केला.

पंजाबची आक्रमक फलंदाजांची फळी मयंकनं कापून काढली अन् तिथंच पंजाबच्या पराभवाची पायाभरणी झाली. मयंकनं सुरूवात केली तर मोहसीन खाननं देखील शेवट करण्याचा चंग बाधला. त्यानं आधी शिखर धवनला बाद केलं त्यानंतर सॅम करनला शुन्यावर माघारी पाठवत पंजाबच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं.

11 व्या षटकात 102 धावांवर असणारं पंजाब किंग्ज 20 व्या षटकात 178 धावांपर्यंतच मजल मारू शकलं. पंजाबचा हा वारू रोखण्यात सिंहाचा वाटा आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या मयंकनं उचलला. पहिल्याच सामन्यात त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT