Krunal Pandya LSG vs PBKS : हार्दिक धावांसाठी तरसतोय कृणालनं मात्र पंजाबची केली धुलाई

Krunal Pandya
Krunal PandyaESAKAL

Krunal Pandya 43 Runs LSG vs PBKS : हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून ट्रान्सफर होऊन मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालाय. मात्र हंगामातील पहिल्या दोन सामन्यात तरी त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. हार्दिकला हैदाराबादविरूद्धच्या सामन्यात 278 चेस करताना देखील काही करता आलं नाही. तो 20 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या फलंदाजीत फेल जात असताना त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने मात्र पंजाबविरूद्ध बॅटिंगमध्ये आपला दम दाखवला.

Krunal Pandya
IPL 2024 : टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर होणार दमछाक... भारतीय खेळाडूंसाठी नो वर्कलोड मॅनेजमेंट!

कृणाल पांड्या 16 व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने आल्या आल्या कगिसो रबाडाला षटकार मारला. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर त्याने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. हर्षल पटेल टाकत असलेल्या 18 व्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारत 20 धावा वसूल केल्या. शेवटच्या दोन षटकात तळाती फलंदाज असल्याने कृणालला डॉट बॉल खेळावे लागले.

Krunal Pandya
Virat Kohli IPL 2024 : विराट कोहलीच्या तीन डावात 181 धावा, सरासरी 90.50 तरी निवडसमिती चिंतेत का?

सामन्याच्या शेवटच्या 5 षटकात लखनौ सुपर जायंट्स संघाला केवळ 53 धावा करता आल्या. यात कृणाल पांड्याचे योगदान ४३ धावांचे होते. त्याने 22 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 4 धावा अतिरिक्त होत्या. त्याच्याशिवाय लखनौच्या एकाही फलंदाजाला डेथ ओव्हर्समध्ये चौकारही मारता आला नाही. कृणाल पांड्याच्या खेळीमुळे लखनौचा संघ पंजाब किंग्जविरुद्ध १९९ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.

पंजाबने 200 धावांचे लक्ष्य गाठले

यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या (५४ धावा) अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आठ गडी गमावून १९९ धावा केल्या. लखनौ संघाचे नेतृत्व निकोलस पुरन करत आहे, ज्याने 42 धावांचे योगदान दिले आणि कृणाल पांड्याने 43 नाबाद धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने २८ धावांत तीन तर अर्शदीप सिंगने दोन बळी घेतले.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com