Michael Clarke on Rohit Sharma sakal
IPL

Rohit Sharma : फक्त क्रिकेट, क्रिकेट अन् क्रिकेट होतंय... रोहितला आता विश्रांतीची गरज; दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

Michael Clarke on Rohit Sharma : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेस पूर्ण जोशात सज्ज होण्यासाठी रोहित शर्माला अल्प विश्रांतीची गरज आहे.

Kiran Mahanavar

Michael Clarke on Rohit Sharma : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेस पूर्ण जोशात सज्ज होण्यासाठी रोहित शर्माला अल्प विश्रांतीची गरज आहे. सततच्या क्रिकेटमुळे त्याला मानसिक थकवा आलेला आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वकरंडक विजेता कर्णधार मायकेल क्लार्क याने मांडले.

वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात १०५ धावांची खेळी केल्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आहे. पुढच्या सहापैकी दोनच सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली आहे.

आपल्या फॉर्मविषयी रोहितला निश्चितच चिंता असेल. माझ्या मते त्याला मानसिक थकवा आलेला असावा, त्यामुळे एकादा छोटासा ब्रेक त्याला पुन्हा ताजेतवाना करणारा ठरेल; परंतु तो मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू असल्यामुळे त्याला आयपीएलमधून विश्रांती मिळणे कठीण आहे, असेही क्लार्कने सांगितले.

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मोठी कसोटी मालिका खेळल्यानंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सलग १२ सामने खेळला आहे. सातत्याने एवढे क्रिकेट खेळल्यावर मानसिक थकवा येणे साहजिकच आहे, असे क्लार्क म्हणतो.

आयपीएलमध्ये सध्या नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई संघाचे अखेरचे दोन सामने शिल्लक आहेत. यातील त्यांचा अखेरचा सामना १७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करण्यापूर्वी रोहित दोन-चार दिवसांसाठी क्रिकेटपासून दूर जाण्याची शक्यता आहे.

हार्दिक पंड्याबाबत बोलताना क्लार्क म्हणाला, गेल्या तीन सामन्यांपासून हार्दिक विकेट मिळवत आहे. त्यासाठी त्याने काही बदल केल्याचे जाणवत आहे. अष्टपैलू खेळाडूसाठी एका क्षेत्रात यश मिळाले की त्याचे रूपांतर दुसऱ्या क्षेत्रात आत्मविश्वास उंचावण्यात होत असतो. हार्दिकला सापडलेला फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganapati Visarjan: मानाच्या गणपतींनी वेळ पाळली, पण... ; ३१ तासांच्या विसर्जन मिरवणुकीवर पोलीस आयुक्त काय म्हणाले?

Ganesh Festival 2025 : पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता मुरुडमध्ये डीजेच्या तालावर विसर्जन

Anjana Krishna Video: महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल.! मिटकरींनी घेतला यु टर्न | Sakal News

Latest Maharashtra News Live Updates: तामिळनाडूत मुसळधार पाऊस! विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली, नागरिकांचे हाल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : विट्याच्या राजा गणेशमूर्तीला भक्तीभावाने निरोप

SCROLL FOR NEXT