Mumbai Indians Sakal
IPL

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

Michael Clarke on Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2024 मधील खराब कामगिरीबाबत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारानं प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians: इंडियन प्रीमयर लीग 2024 स्पर्धेत पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यांना आत्तापर्यंत खेळला गेलेल्या 9 सामन्यांपैकी 3 सामन्यांतच विजय मिळवता आलेली आहे.

मुंबईच्या या खराब कामगिरीमागे संघात दुफळी निर्माण झाल्याची शंका ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केली आहे.

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबईने नेतृत्वबदल केला होता. त्यांना 5 वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्माला हटवत त्याच्या जागेवर हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. त्यामुळे मुंबई इंडियन्सवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे.

आता हा अचानक झालेल्या बदलालाने मुंबई संघात अनेक गोष्टी बदलल्याचे मत क्लार्कने व्यक्त केले आहे.

स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाईव्हमध्ये बोलताना क्लार्क म्हणाला, 'मला माहित नाही, ते प्लेऑफमध्ये पोहचतील की नाही. जे बाहेरून दिसत आहे, त्यापेक्षाही जास्त काहीतरी आत चालू आहे. तुमच्याकडे इतके चांगले खेळाडू असूनही तुमची कामगिरी इतकी अस्थिर असू शकत नाही.'

'त्यामुळे मला वाटके मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे ग्रुप झाले आहेत आणि हे असे काहीतरी आहे जे काम करत नाहीये. ते एकत्र मिसळत नाहीयेत. एक संघ म्हणून खेळत नाहीयेत.'

याशिवाय क्लार्क असंही म्हणाला की एखाद्या खेळाडूचा चांगला वैयक्तिक खेळही त्यांना विजय मिळवून देऊ शकतो. तो म्हणाला, 'जर रोहित शर्माने येऊन आणखी एखादे शतक केले किंवा हार्दिकने चांगली खेळी केली किंवा बुमराह पुन्हा शानदार गोलंदाजी करत असेल, तर काहीही होऊ शकते.'

दरम्यान, सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहेत. अद्याप त्यांचे ५ सामने बाकी आहेत. त्यामुळे जर त्यांना आव्हान कायम ठेवायचे असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT