ms dhoni gave-big-statement-after-csk 
IPL

IPL 2023: पराभवाची जबाबदारी यांचीच! धोनीने कोणाच्या डोक्यावर फोडलं खापर?

1 चेंडू 5 धावा अन् समोर होता धोनी, मात्र आता तो काळही राहिला नाही

Kiran Mahanavar

IPL 2023 : आयपीएल 2023च्या 17व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव करून एक रोमांचक सामना जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना राजस्थानने 8 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ केवळ 172 धावा करू शकला. या सामन्यानंतर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं.

सीएसकेच्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी म्हणाला ,की मला वाटते की आम्हाला मधल्या षटकांमध्ये आणखी काही स्ट्राइक रोटेशनची आवश्यकता आहे. स्पिनर्ससाठी फारसे काही नव्हते परंतु त्यांच्याकडे अनुभवी फिरकीपटू होते, आम्ही स्ट्राइक रोटेट करू शकलो नाही. ते इतके अवघड नव्हते. आम्ही शेवटची जोडी असल्याने अंतर गाठले हे चांगले झाले.

धोनी पुढे म्हणाला की, जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हा त्याचा रनरेटवर खरोखर परिणाम होतो. तुम्ही मैदान बघा, बॉलर बघा आणि बॉलर काय करण्याचा प्रयत्न करत आहे, मग फक्त उभे राहून त्यांच्या चुका होण्याची वाट बघा, त्यांनी चांगल्या गोलंदाजी केली.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना सीएसकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा स्टार सलामीवीर गायकवाड अवघ्या 8 धावा करून बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉनवे (50) आणि अजिंक्य रहाणे (31) यांनी मोठी भागीदारी करत सीएसकेला सामन्यात परत आणले. मात्र यानंतर मधल्या फळीत फलंदाजीला आलेले शिवम दुबे, मोईन अली आणि अंबाती रायडू यांना काही विशेष करता आले नाही.

अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर जबाबदारी आली. CSK ला शेवटच्या 2 षटकात 40 धावांची गरज होती. धोनी आणि जडेजा जोडीने जेसन होल्डरच्या षटकात 19 धावा जमवल्या. संदीप शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी पेलली आणि त्याला 21 धावा वाचवायच्या होत्या. या षटकाच्या दुसऱ्या बाजूला तिसऱ्या चेंडूवर संदीपने षटकार ठोकला आणि सामना सीएसकेच्या हातात आला. पण शेवटी संदीपने दोन यॉर्कर फेकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धोनी 17 चेंडूत 32 आणि जडेजाने 15 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT