MS Dhoni reaction on Virat Kohli six Sakal
IPL

IPL 2024: विराटचे दोन खणखणीत षटकार अन् धोनीचा देशपांडेला 'तो' इशारा, RCB vs CSK सामन्यातील Video व्हायरल

MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्ससाठी विराटने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने तुषार देशपांडेला एकाच षटकात दोन खणखणीत षटकार ठोकल्यानंतर एमएस धोनीकडूनही प्रतिक्रिया उमटली होती.

Pranali Kodre

MS Dhoni - Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 68 वा सामना शनिवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेंगळुरू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले.

या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. दरम्यान, तिसऱ्या षटकात चेन्नईकडून तुषार देशपांडे गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर विराटने षटकार मारला, तर तिसऱ्या चेंडूवरही विराटने खणखणीत षटकार ठोकला.

त्यावेळी यष्टीरक्षण करत असलेला एमएस धोनी निराश दिसला. त्यावेळी त्याने देशपांडेला एक इशाराही केला, त्याने तो इशारा मी पुढे येऊ का किंवा देशपांडेच्या गोलंदाजीच्या टप्प्याबद्दल केला असल्याचे कयास सध्या लावला जात आहे.

धोनीच्या त्या इशाऱ्यानंतर मात्र देशपांडेने त्याच्या चेंडूच्या टप्प्यात थोडा बदल केल्याचे दिसले, त्यानंतर त्याने शेवटच्या तीन षटकात एकच धाव दिली.

दरम्यान, या षटकानंतर पावसाला सुरुवात झाल्याने काहीकाळ सामना थांबवण्यात आला होता. सामना थांबला तेव्हा बेंगळुरूने ३ षटकात बिनबाद ३१ धावा केल्या. त्यावेळी विराट १९ धावांवर आणि डू प्लेसिस १२ धावांवर नाबाद होता.

या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अलीच्या जागेवर मिचेल सँटेनरला संधी देण्यात आली आहे. तसेच बेंगळुरूने विल जॅक्सच्या जागेवर ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली आहे.

चेन्नई - बेंगळुरूचे प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स - रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिश तिक्षणा

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - शिवम दुबे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, मुकेश चौधरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाख, हिमांशू शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT