Arjun Tendulkar Yorker Ishan Kishan Stump Fly in Air
Arjun Tendulkar Yorker Ishan Kishan Stump Fly in Air ESAKAL
IPL

VIDEO : अर्जुन तेंडुलकरने 15 कोटी घेणाऱ्या किशनची केली दांडी गुल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) सर्वात हाय व्होल्टेज सामना आज डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ भिडणार आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्स आपल्या सलग सहा पराभवानंतर पहिला विजय मिळवण्यासाठी नेट्समध्ये चांगलाच घाम गाळताना दिसली. याच नेट सेशनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मुंबईच्या 15 कोटी खर्चून घेतलेला इशान किशनची (Ishan Kishan) दांडी एका अप्रतिम यॉर्करवर उडवली. (Mumbai Indians Arjun Tendulkar Yorker Ishan Kishan Stump Fly in Air)

पदरात सहा पराभव घेऊन बसलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात प्ले ऑफ गाठेल अशी कोणती आशा सध्या तरी दिसत नाहीये. त्यामुळे आता बेंचवर बसलेल्या युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्याची जोरदार मागणी चाहत्यांकडून होत आहे. यात सर्वात आघाडीवर आहे ते सचिन तेंडुलकरच्या मुलाचे अर्जुन तेंडुलकरचे नाव आघाडीवर आहे. मुंबईची गोलंदाजीतील धार कमी झाली आहे. ही धार वाढवण्यासाठी डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी सराव करत असताना अर्जुन तेंडुलकरने इशान किशनची एका अप्रतिम यॉर्करवर त्रिफळा उडवला. विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकर जहीर खानच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. मुंबईने त्याला 30 लाख रूपयाला मेगा लिलावात खरेदी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT