IPL 2023 Mumbai Indians 
IPL

IPL 2023: सामन्याच्या काही तास आधी रोहितच्या मुंबई इंडियन्सने केली मोठी घोषणा!

मुंबई इंडियन्स संघाची मोठी घोषणा! आज दुपारच्या सामन्यात....

Kiran Mahanavar

IPL 2023 Mumbai Indians : आयपीएल 2023चा 22वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 3.30 पासून दोन्ही संघ आमनेसामने येतील.

मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात महिला संघाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. विशेष ESA दिवशी मुंबई संघ महिला संघाची जर्सी परिधान करेल. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी आणि मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे मुलींना खेळाला व्यवसाय म्हणून घेण्यास प्रवृत्त होईल. या दरम्यान 19 हजार मुली सामना पाहण्यासाठी येणार आहेत.

आयपीएल 2023 मधील दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर KKRच्या संघाने आतापर्यंत मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. मुंबईने सध्या तीन आणि केकेआरने लीगमध्ये चार सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने एक जिंकला असून दोन पराभव पत्करले आहेत. त्याचबरोबर केकेआरने चारपैकी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT