IPL 2024 LSG vs PBKS sakal
IPL

IPL 2024 LSG vs PBKS : पहिल्या विजयासाठी लखनौ सज्ज ; पंजाब किंग्सविरुद्ध आज घरच्या मैदानावर लढत

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंटस्‌ संघ उद्या घरच्या मैदानावर होणार असलेल्या आयपीएल साखळी लढतीत पंजाब किंग्सशी दोन हात करणार आहे. सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर आता लखनौचा संघ विजयाच्या बोहणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंटस्‌ संघ उद्या घरच्या मैदानावर होणार असलेल्या आयपीएल साखळी लढतीत पंजाब किंग्सशी दोन हात करणार आहे. सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर आता लखनौचा संघ विजयाच्या बोहणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर पंजाबच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून हार पत्करावी लागली. आता हा पराभव मागे टाकत लखनौविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी पंजाबचा संघ सज्ज झाला असेल.

मार्क वूड व डेव्हिड विली या दोन वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत लखनौचा गोलंदाजी विभाग कमकुवत वाटत आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीत कृणाल पंड्या वगळता एकाही गोलंदाजाला ठसा उमटवता आला नाही. मोहसीन खान, नवीन उल हक व यश ठाकूर या युवा गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असून त्यांना चमक दाखवावी लागणार आहे. टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या रवी बिश्‍नोईला पहिल्या लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले. त्याच्याकडून कामगिरी उंचावण्याची गरज आहे.

राजस्थानविरुद्धच्या लढतीत लखनौच्या दोनच फलंदाजांकडून धडाकेबाज कामगिरी झाली. कर्णधार के. एल. राहुल व निकोलस पुरन ही त्यांची नावे. राहुल यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडत आहे. आगामी टी-२० विश्‍वकरंडकात राहुलकडे फलंदाज व यष्टिरक्षक अशी दुहेरी भूमिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलपासूनच तो याची तयारी करीत आहे. मात्र या दोघांसह क्विंटॉन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या यांना आपली जबाबदारी गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. मार्कस स्टॉयनिस या अष्टपैलू खेळाडूलाही आपली चुणूक दाखवावी लागेल.

बेअरस्टो, धवनवर मदार

बंगळूरविरुद्धच्या लढतीत कर्णधार शिखर धवन याने ४५ धावांची खेळी केली; पण टी-२० क्रिकेटकडे बघता ही वेगवान खेळी नव्हती. स्वत: धवन याने हे कबुल केले. सध्या आयपीएल एके आयपीएल फक्त एवढेच क्रिकेट खेळत असलेल्या धवनला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. पहिल्या दोन्ही लढतींत जॉनी बेअरस्टो याच्याकडून निराशा झाली. धवन व बेअरस्टो या अनुभवी फलंदाजांवर पंजाबची मदार असून त्यांनाच दबाव झुगारून सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. प्रभसिमरन सिंग, सॅम करन, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजांकडूनही त्यांना आशा आहेत.

रबाडा, ब्रारची चमक

पंजाबच्या दोनच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. कागिसो रबाडा व हरप्रीत ब्रार यांच्याकडून छान कामगिरी झाली आहे; पण अर्शदीप सिंग, सॅम करन, हर्षल पटेल व राहुल चहर यांना अपेक्षा पूर्ण करता आलेली नाही. या सर्व गोलंदाजांना उद्या राहुलच्या सेनेला रोखावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT