R Ashwin Returns in CSK Fold eSakal
IPL

R Ashwin Returns : IPL 2025पूर्वी धोनीच्या चेन्नईमध्ये परतणार आर अश्विन; फ्रँचायझीने दिली 'ही' मोठी जबाबदारी

R Ashwin Returns in CSK Fold: अनुभवी ऑफ-स्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करत आहे.

Kiran Mahanavar

R Ashwin Returns in CSK Fold : अनुभवी ऑफ-स्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करत आहे. तो पुन्हा एकदा इंडिया सिमेंटशी जोडला गेला आहे.

रिपोर्ट्सनुसार, अश्विन चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्ज संघात दिसण्याची शक्यता बळावली आहे.

रविचंद्रन अश्विनने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज संघातून केली होती. त्या काळात त्याला जगातील अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली.

अश्विनने मुथय्या मुरलीधरनसारख्या फिरकीपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती, जो एक महान स्पिनर होता. याचा मोठा फायदा अश्विनला झाला. तथापि, त्याला काही हंगामांनंतर सोडण्यात आले आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या संघांचा भाग बनला.

आयपीएल 2025 साठी एक मेगा लिलाव होणार आहे आणि या दरम्यान अनेक खेळाडूंच्या संघात फेरबदल होणार आहेत. याआधी अश्विनला पुन्हा एकदा इंडिया सिमेंटशी जोडण्याची संधी मिळाली.

अश्विन आता चेन्नई सुपर किंग्जच्या हाय परफॉर्मन्स सेंटरची जबाबदारी सांभाळणार आहे. हे केंद्र चेन्नईच्या हद्दीत बांधण्यात आले असून आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी ते पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT