पुणे : रॉयल चॅलेंजर बेंगलोरला राजस्थान रॉयल्सने ठेवलेले 145 धावांचे माफक आव्हान पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 115 धावात माघारी गेला. राजस्थानने सामना 29 धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचली. राजस्थानकडून कुलदीप सेन 4 तर आर. अश्विनने 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत राजस्थानकडून रियान परागने झुंजार खेळ करत 56 धावांची खेळी केली. आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक 23 धावा केल्या. (Rajasthan Royals Defeat Royal Challengers Bangalore Push Gujarat Giants 2nd Spot In Point Table)
राजस्थानचे 145 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरूवात खराब झाली, गेल्या दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद झालेला विराट काहली आज सलामी देण्यासाठी आला. मात्र त्याचा खराब फॉर्म सलामीला देखील कायम राहिला. तो पहिल्या चेंडूपासूनच चाचपडत खेळत होता. अखेर प्रसिद्ध कृष्णाने त्याला 9 धावांवर बाद करत त्याची धावा करण्याची धडपड संपवली.
विराट कोहली बाद झाल्यानंंतर ड्युप्लेसिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 21 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. मात्र कुलदीप सेनच्या वेगाने त्याला चकवले. आणि तो झेलबाद झाला. वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने ड्युप्लेसिस पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलला देखील बाद करत आरसीबीला सलग दोन मोठे धक्के दिले. मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद झाला.
त्यानंतर रजत पाटीदारचा त्रिफळा उडवल्यानंतर अश्विनने सुयश प्रभदेसाईला देखील 2 धावांवर बाद करत राजस्थानची अवस्था 5 बाद 66 अशी केली. अश्विनने शाहबाज अहमदला आणि कुलदीपने वानिंदू हसरंगाला बाद करत आरसीबीचे तगडे फलंदाज माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना फार काळ तग धरता आला नाही. अखेर आरसीबीचा डाव 115 धावात गुंडाळत सामना 29 धावांनी जिंकला. राजस्थान कडून कुलदीपने सर्वाधिक 4 तर आर अश्विनने 3 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने देखील 2 विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आरसीबीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत पॉवर प्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची अवस्था 3 बाद 33 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन अश्विन यांना बाद केले. तर हेजलवूडने जॉस बटलरला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला.
यानंतर कर्णधार संजू सॅमसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र वानिंदू हसरंगाने 27 धावा करणाऱ्या सॅमसनला आणि त्यानंतर हेटमायरला बाद करत राजस्थानचे दोन आक्रमक फलंदाज माघारी धाडले. दरम्यान हेडलवूडने डॅलेर मिशेलला बाद करत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.
मात्र रियान परागने एक बाजू लावून धरली होती. त्याने शेवटच्या दोन षटकात 12 आणि 18 धावा चोपून राजस्थानला 144 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 31 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.