Rinku Singh - Rishabh Pant Sakal
IPL

IPL 2024: KKR च्या विजयानंतर रिंकु सिंगचा ऋषभ पंतला Video कॉल, पाहा काय झालं दोघांमध्ये संभाषण

Rinku Singh - Rishabh Pant: कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करताना रिंकू सिंगने ऋषभ पंतशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला होता.

Pranali Kodre

Rinku Singh - Rishabh Pant: इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

कोलकाता संघाने या विजेतेपदानंतर जोरदार सेलीब्रेशन केले. खेळाडू एकमेकांना भेटून अलिंगन देत आनंद साजरा करत होते. याचदरम्यान कोलकाताचा धडाकेबाज फलंदाज रिंकु सिंगने भारतीय संघाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला. त्यांचा व्हिडिओही कोलकाताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंत सध्या भारतीय संघासह टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी अमेरिकेला गेला आहे. त्याने रिंकु सिंगचे आयपीएल विजयाबद्दल अभिनंदनही केले. तसेच रिंकु त्याला म्हणाला, 'भैय्या मी 28 मे ला अमेरिकेला येतोय.' हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रिंकुचा आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे तोही आता लवकरच अमेरिकेला रवाना होईल.

अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हैदराबादला कोलकाताने 18.3 षटकात 113 धावांवरच रोखले. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी केली. त्याचबरोबर एडेन मार्करमने 20 धावांची खेळी केली. पण बाकी कोणालाच खास काही करता आले नाही.

कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कोलकाताने 10.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तसेच रेहमनुल्लाह गुरबाजने 39 धावा केल्या. हैदराबादकडून गोलंदाजीत कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT