Virat Kohli - Rinku Singh Sakal
IPL

Rinku Singh-Virat Kohli: 'तू माझी बॅट तोडलीस...', सामन्याआधी रिंकूवर ओरडला विराट; पाहा असं झालं तरी काय?

Rinku Singh-Virat Kohli Video: केकेआर आणि आरसीबी संघ आमने-सामने येण्यापूर्वी विराट कोहली आणि रिंकू सिंग भेटले होते, यावेळी त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Pranali Kodre

KKR vs RCB, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात रविवारी (21 एप्रिल) सामना होणार आहे. ईडन गार्डन्सवर दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, या सामन्याआधी बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग भेटले होते. या दोघांच्या भेटीदरम्यान विराट रिंकूवर नाटकीय स्वरुपात चिडतानाही दिसला.

नक्की झालं काय?

विराटने रिंकू सिंगला एक बॅट दिली होती, ज्या बॅटने रिंकू खेळत होता. परंतु, त्याच्याकडून ती बॅट तुटली. याबाबतचे हे दोघे संभाषण करत असतानाचा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की रिंकू विराटला सांगत आहे की फिरकीपटूविरुद्ध खेळताना ती बॅट तुटली. त्यावर काहीशा नाटकीय रागात विराट म्हणाला, 'फिरकी गोलंदाजाविरुद्ध तू माझी बॅट तोडलीस? कुठे तोडलीस?' त्यावर रिंकून त्याला बॅट कुठे तुटली हे सांगितलं.

त्यावर विराट त्याला म्हणाला, 'पण यावर मी काय करू?' त्यावर रिंकू म्हणाला, 'काही नाही मी फक्त सांगितलं.' त्यावर विराट म्हणाला, 'काही नाही, सांगितलं ना तू, चांगलं झालं. मला ही माहिती नकोय.' त्यानंतर रिंकूने त्याला विचारलं की तू बॅट पाठवतोय का?

विराटनेही त्यावर कोणाला पाठवायचंय, असं विचारल्यानंतर रिंकूने त्याच्या हातात असलेल्या बॅट त्याला परत दिल्या. यानंतर विराट त्याला म्हणाला, 'दोन सामन्यात दोन बॅट द्यायच्या का? तुझ्यामुळे नंतर माझी जी हालत होते ना.' त्यानंतर रिंकू त्याला म्हणाला, 'मी शब्द देतो, परत नाही तोडणार बॅट. ती तुटलेली बॅट ठेवली आहे, तुला दाखवतो.'

दरम्यान, त्यांच्यातील या संभाषणाच्या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून हा व्हिडिओ व्हायरलही होत आहे.

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये

दरम्यान, विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएलमध्ये 2024 मध्ये सर्वाधिक 361 धावा केल्या आहेत. मात्र, अद्याप रिंकू सिंगला फार काही करता आलेले नाही. त्याने 6 सामन्यांत 83 धावा केल्या आहेत.

कोलकाता - बेंगळुरू आमने-सामने

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि बेंगळुरू दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी बेंगळुरूला झालेल्या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. आता बेंगळुरू या पराभवाचा वचपा काढण्याबरोबरच विजयी मार्गावर येण्यासाठीही प्रयत्नशील असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT