IPL 2024 CSK vs DC sakal
IPL

IPL 2024 CSK vs DC : चेन्नई एक्स्प्रेसला रोखणार कसे? ;दिल्ली कॅपिटल संघासमोर पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचेही आव्हान

सलग दोन सामन्यांत शानदार विजय मिळवून यंदाच्याही आयपीएलमध्ये ठाम वाटचाल सुरू करणाऱ्या गतविजेत्या चेन्नईचा सामना कसा करायचा, हा प्रश्न रिषभ पंत याच्या दिल्ली संघाला पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विशाखापट्टणम : सलग दोन सामन्यांत शानदार विजय मिळवून यंदाच्याही आयपीएलमध्ये ठाम वाटचाल सुरू करणाऱ्या गतविजेत्या चेन्नईचा सामना कसा करायचा, हा प्रश्न रिषभ पंत याच्या दिल्ली संघाला पडला आहे. पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

ट्वेन्टी-२० प्रकारात लौकिकाच्या बाता केवळ नाणेफेक होईपर्यंत ताज्या असतात. मैदानात उतरल्यावर सर्वोत्तम कामगिरी करणारा संघच बाजी मारत असतो. कर्णधार बदललेला असला तरी सूत्रे हाती असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ दिल्लीवर गेल्या चार सामन्यांत भारी ठरलेला आहे. हे सामने त्यांनी ९१, २७ आणि ७७ धावांनी जिंकलेले आहेत. गतवर्षी रिषभ पंत दिल्ली संघात नव्हता, मात्र इतर बहुतेक खेळाडू तेच असल्याने दिल्लीकरांना नव्या मानसिकतेनुसार आता मैदानात उतरावे लागणार आहे.

चेन्नई संघात ४२ वर्षीय धोनीचा अपवाद वगळता तसे फार नावाजलेले खेळाडू नाहीत; परंतु प्रत्येक खेळाडू आपले नाणे खणखणीत वाजवत आहे म्हणून यंदाही पहिले दोन सामने त्यांनी जिंकलेले आहे. या संघाविरुद्ध कशी व्यूहरचना करायची याचे कोडे एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा निष्णात कर्णधार असलेल्या आणि आता दिल्ली संघाचा प्रशिक्षक असेल्या रिकी पाँटिंगला सोडवावे लागणार आहे. दिल्ली संघाच्या व्यवस्थापनात सौरव गांगुलीचाही समावेश आहे तरीही त्यांना दोन सामन्यांत विजयाचा मार्ग शोधता आलेला नाही.

भारतीय संघातून दूर असलेला अजिंक्य रहाणे चेन्नई संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. तर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात सध्या विचारही न होत असलेला शिवम दुबे हा त्यांचा हुकमी एक्का आहे. यंदाच्या मिनी लिलावात ८.४० कोटी रुपयांची किंमत मोजलेला नवखा समीर रिझवी पंजाबविरुद्ध पहिल्यांदा मैदानात येतो आणि दोन खणखणीत षटकार मारून आपली गुणवत्ता सादर करतो. या तुलनेत दिल्ली संघात गलेलठ्ठ रक्कम मिळालेले आणि नावाजलेले खेळाडू आहेत; परंतु त्यातील कोणालाही ठोस कामगिरी करता आलेली नाही.

दिल्ली संघ व्यवस्थापन अजूनही चाचपडत आहेत याचे उदाहरण म्हणजे रिकी भूई. या खेळाडूने नुकत्याच संपलेल्या रणजी क्रिकेट मोसमात सर्वाधिक ९०२ धावा केल्या. त्यामुळे त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले; परंतु दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरचा उसळता चेंडू रिकी भुईला ‘भुईसपाट’ करून गेला.

दिल्लीची मधली फळी एकदमच कमकुवत वाटत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरणारा रिषभ पंतला फॉर्म मिळवण्यासाठी काही वेळ लागणार हे उघड आहे. त्यामुळे वॉर्नर-मार्श बाद झाल्यानंतर दिल्ली फलंदाजीच्या मर्यादा उघड होत आहेत. शेय होप आणि त्रिस्तन स्टब्स यांना अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही.

दिल्ली संघात एन्रिक नॉर्किया हा एकमेव भरवशाचा वेगवान गोलंदाज आहे; परंतु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रियान परागने त्याच्या अंतिम षटकांत २५ धावा फटकावून नॉर्कियाच्या आत्मविश्वासाला तडा दिलेला आहे. उद्याच्या सामन्यात तो राचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा यांच्यासमोर कशी गोलंदाजी करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT