Rituraj Gaikwad innings was overshadowed by MS Dhoni's two sixes in csk vs lsg match ipl 2023  
IPL

Ruturaj Gaikwad : धोनी फक्त ३ बॉल खेळला अन् ऋतुराजचं सगळं क्रेडिट खाऊन गेला

रोहित कणसे

सध्या आयपीएल (IPL 2023) सामन्यांची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. सोमवारी असाच एक रंगतदार सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती धोनीने लगावलेल्या दोन सिक्सरची.

पण धोनीच्या या दोन षटकारांमुळे मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची खेळी मात्र झाकाळून गेल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली.

ऋतुराजचं सलग दुसरं अर्धशतक...

आयपीएलच्या या सामन्यांत ऋतुराज गायकवाडने अवघ्या 31 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 57 धावांची स्फोटक खेळी खेळली. ऋतुराजने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यादरम्यान गायकवाडने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

धोनी आला अन्...

सीएसकेचे सहा गडी बाद झाल्यानंतर थाला एमएस धोनी मैदानावर आला आणि सगळ्या स्टेडीयमवर एकच नाव गाजत राहीलं. धोनीने देखील त्याच्या चाहत्यांना निराश केलं नाही. तो ओळखला जातो त्याच शैलीत धोनीने खेळायला सुरूवात केली. धोनी या सामन्यात अवघे तीन चेंडू खेळला. यापैकी पहिल्या दोन चेंडूवर त्याने दोन सिक्सर लगावले.

याच ओव्हरमध्ये धोनी तिसऱ्या चेंडूवर बाद देखील झाला. यानंतर सोशल मीडियावर मात्र धोनीचं तोंडभरून कौतुक केलं गेलं. यानंतर ऋतुराजच्या खेळीची चर्चा मात्र यासगळ्यामध्ये थोडीशी मागं पडल्याचं दिसून आलं.

मॅचमध्ये काय झालं?

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या 57 आणि डेव्हॉन कॉनवेच्या 47 धावांच्या जोरावर 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. लखनौला चांगली सुरुवात करूनही हे लक्ष्य गाठता आले नाही. मोईन अलीच्या फिरकीसमोर पूर्ण 20 षटके खेळल्यानंतर लखनऊला सात गडी गमावून 205 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT