Rohit Sharma Retirement Plan  esakal
IPL

Rohit Sharma Retirement : आयुष्य कुठं घेऊन जाईल... रोहित शर्मा निवृत्तीबाबत पहिल्यांदाच एवढं काही बोलला

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Retirement Statement : रोहित शर्मा सध्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. सध्या तो संघाचा कर्णधार नसला तरी तो संघासाठी आपलं सर्वस्व देताना दिसतोय. रोहितच्या डोळ्यासमोर आता फक्त आणि फक्त जून महिन्यात सुरू होणारा टी 20 वर्ल्डकप आहे. हा रोहित अन् विराटचा शेवटचा वर्ल्डकप असल्याची चर्चा सुरू आहे.

मात्र 36 वर्षाच्या रोहित शर्माने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबाबत आपलं मत व्यक्त केले. ब्रेक फास्ट विथ चॅम्पियन्स या यूट्यूब शोमध्ये बोलताना रोहित म्हणाला की, तो सध्याच्या घडीला तरी निवृत्तीबाबत विचार करत नाहीये. त्याला अजून भारताकडून खेळताना मोठी कामगिरी करायची आहे.

रोहित शर्मा या शोमध्ये म्हणाला की, 'मी निवृत्तीबाबत अजून विचार करत नाहीये. मात्र आयुष्य कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही. मी सध्याच्या घडीला चांगलं खेळतोय. त्यामुळं मी अजून काही वर्षे तरी माझं क्रिकेट सुरू ठेवण्याचा विचार करतोय. मला माहिती नाही पण मला खरंच वर्ल्डकप जिंक्याचा आहे. त्यानंतर 2025 मध्ये WTC final देखील आहे. आशा आहे की भारतीय संघ जिंकेल.'

रोहित शर्माने वनडे वर्ल्डकप 2023 च्या स्वप्नभंगाबाबत देखील मन मोकळं केलं. तो म्हणाला की, '50 षटकांचा वर्ल्डकप हा माझ्यासाठी खरा वर्ल्डकप आहे. आम्ही तो वर्ल्डकप पाहूनच लहानचे मोठे झालो आहोत. विशेष म्हणजे 2023 चा वर्ल्डकप हा भारतात होत होता. आम्ही फायनलपर्यंत खूप चांगलं खेळलो. ज्यावेळी आम्ही सेमी फायनल जिंकलो त्यावेळी वाटलं आपण फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्व गोष्टी योग्य करण्याचा प्रयत्न केला.'

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्ही वर्ल्डकप कशामुळे हरलो असं वाचराल तर माझ्या मनात एकही अशी गोष्ट येत नाही ज्यामुळे आम्ही वर्ल्डकप हरलो. माझ्या मते आम्ही सर्व गोष्टी योग्य केल्या होत्या. आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. आत्मविश्वास देखील होता.'

'आपल्या सर्वांना एक दिवस खूप वाईट जातो. मला वाटतं तो आमचा वाईट दिवस होता. आम्ही फायनलमध्ये खराब खेळलो असं मला वाटत नाही. काही गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत. मात्र ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा थोडी चांगली खेळली.'

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ahilyanagar Traffic: पुणे अहिल्यानगर रस्ता पुन्हा कोंडीत; कासारी फाटा येथे वाहनांच्या रांगा, पोलिस कर्मचारी नेमण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

इतकी गोड चेटकीण पण पाय... प्रेक्षकांना कसा वाटला 'काजळमाया' मालिकेचा पहिला भाग? म्हणतात- थोडी ओव्हर अ‍ॅक्टिंग

Mumbai News: वडापावमध्ये चटणी नाही, चहावाला प्लॅस्टिकचे कप वापरतो! पोलिसांच्या हेल्पलाइनवर अजब तक्रारींचा पाऊस

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

SCROLL FOR NEXT