ANI
IPL

IPL 2021: मुंबई स्पर्धेबाहेर?; प्लेऑफसाठी रोहितच्या फलटणला...

नामदेव कुंभार

IPL 2021 : आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यात हेलकावे खाणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा अधिकच अंधुक झाल्या आहेत. शनिवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. या पराभवामुळे मुंबई सातव्या क्रमांकावर पोहचली आहे. 12 सामन्यात मुंबईला सात पराभव स्विकारावे लागले आहेत. पाच विजयासाह मुंबईचे 12 सामन्यात 10 गुण आहेत. प्ले ऑफच्या स्पर्धेत आता रोहितच्या फलटणला स्वत:चा नेट रेट तर वाढवावाच लागेल शिवाय इतरांच्या पराभवावरही त्यांना अवलंबून राहावं लागेल.

मुंबईचे दोन सामने बाकी आहेत. हैदराबाद आणि राजस्थानविरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. यामध्ये हैदराबाद संघाचं स्पर्धेतील आवाहन संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे गमावण्यासाठी त्यांच्याकडे काहीचं नाही. हैदराबाद स्पर्धेतील शेवट गोड करण्याच्या हिशेबानं मैदानात उतरेल. राजस्थान संघाचेही सध्या दहा गुण आहेत. स्पर्धेतील आवाहन जिवंत ठेवण्यासाठी त्यांनाही उर्वरित दोन सामने जिंकणे आवशक आहे. त्यापैकी एक सामना आरसीबी आणि दुसरा सामना मुंबईविरोधात असेल. याशिवाय कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्या कामगिरीवरही मुंबई संघाचा प्लेऑफमधील प्रवेश अवलंबून आहे.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही गतविजेत्यांचा पराभव; फलंदाजांचे पुन्हा अपयश

शारजाच्या संथ खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे फलंदाज अडखळत राहिले. जेमतेम १२९ धावा त्यांना करता आल्या. दिल्ली फलंदाजांनीही या आव्हानासमोर अतिशय विचारपूर्वक फलंदाजी करत विजयी लक्ष्य पाच चेंडू असताना पार केले. अमिरातीतच झालेल्या गतआयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत असताना दिल्लीने मुंबईविरुद्धचे चारही सामने गमावले होते. आजच्या सामन्यात हाच श्रेयस अय्यर मुंबई इंडियन्ससाठी भारी ठरला. जेथे सर्व फलंदाज अडखळत होते तेथे श्रेयसने अखेरपर्यंत नाबाद राहत ३३ चेंडूत ३३ धावा फटकावल्या, यात त्याचे अवघे दोनच चौकार होते, परंतु एक बाजू सांभाळण्याची जबाबदारी त्याने पार पाडली. १३० धावांचे आव्हान शारजाच्या खेळपट्टीवर फसवे होते. मुंबईच्या गोलंदाजांनी पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि स्टिव स्मिथ असे पहिले तीन फलंदाज ३० धावांत बाद करून लढा सुरू केला होता, परंतु रिषभ पंतने २२ चेंडूत २६ धावा करून दडपण कमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT