Sachin Tendulkar Share Video of Hotel Room
Sachin Tendulkar Share Video of Hotel Room ESAKAL
IPL

VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मास्टर ब्लास्टर मेंटॉरला मिळाले 'स्वीट' सरप्राईज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपली 2022 मधील आयपीएल मोहीम रविवारी ( 27 मार्च) सुरू करणार आहे. दरम्यान, संघाचा मेंटॉर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील आपल्या फ्रेंचायजीबरोबर जोडला गेला आहे. सचिन तेंडुलकरने ट्रायडंट हॉटेलमधील एक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स आणि हॉटेल प्रशासनाने त्याला दिलेल्या स्वीट सरप्राईजचा (sweet Surprise) व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर ज्या हॉटेलमध्ये विलगीकरणात राहणार आहे त्या हॉटेलच्या रूममध्ये एक सरप्राईज ठेवण्यात आले होते. या सरप्राईजने मास्टर ब्लास्टर देखील भारावून गेला. सचिन आठवणींमध्ये रमला. या व्हिडिओथ सचिन तेंडुलकरचा क्रिकेट प्रवास (Cricket Journy) दाखवला आहे. हा प्रवास दाखवताना चॉकलेट आणि मिठाईचा वापर करण्यात आला आहे.

सचिनने या सर्वाचा व्हिडिओ शेअर करत त्याला 'मी ज्यावेळी हॉटेलच्या रूममध्ये आलो त्यावेळी मला हे सर्व दिसले. आता आपण म्हणू शकतो की क्वारंटाईन टाईमलाईन.'

सचिन तेंडुलकरने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून विनोद कांबळी, सुरेश रैना अशा अनेक क्रिकेटपटूंनी यावर प्रतिक्रिया दिली. कांबळीने जुन्या आठवणी पाहून कमेेंट केली की, खूप छान मास्टर, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.' हा व्हिडिओ पाहून सचिनचे चाहते देखील नॉस्टॅल्जिक झाले.

आयीपएलचा 15 वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. हंगामातील पहिला सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना रविवारी (दि. 27 मार्च) दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना दुपारी 3.30 ला सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT