Sanjay Manjrekar | Shreyas Iyer | KKR vs DC | IPL 2024 Sakal
IPL

KKR vs DC : 'टॉससाठी नव्हतं यायला पाहिजे मग!', श्रेयस अय्यरला असं का म्हणाले संजय मांजरेकर?

Sanjay Manjrekar: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याआधी टॉसवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचं उत्तर ऐकून संजय मांजरेकर यांनी अनोखी प्रतिक्रिया दिली होती.

Pranali Kodre

IPL 2024, KKR vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (29 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने सोपा विजय मिळवला. दरम्यान, या सामन्याच्या नाणेफेकीवेळी एक गमतीशीर कमेंट संजय मांजरेकर यांनी केली होती.

झाले असे की नाणेफेकीसाठी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत उभे होते. त्यांच्यासह सामनाधिकारी आणि प्रेझेंटेटर संजय मांजरेकर होते. यावेळी पंतने नाणेफक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्याने याबद्दल सामनाधिकारी आणि श्रेयस अय्यरला माहिती दिल्यानंतर तो मांजरेकर यांच्याशी बोलला. यानंतर श्रेयस अय्यर मांजरेकरांशी बोलायला आला, त्यावेळी त्यांनी तुला प्रथम काय कारायची इच्छा होती, अशा अर्थाचा प्रश्न विचारला.

त्यावर श्रेयसने त्यांना उत्तर दिले की त्याला प्रथम गोलंदाजीच करायची होती आणि पंतने प्रथम फलंदाजी निवडल्याने त्याची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे मांजरेकर लगेचच त्याला म्हणाले, 'तर मग आज आपण नाणेफेकीसाठी नसतो आलो, तरी चाललं असतं.'

दिल्लीचा पराभव

दरम्यान, दिल्लीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडल्याचा फायदा उचलता आला नाही. या सामन्यात दिल्लीचा संघ 20 षटकात 9 बाद 153 धावाच करू शकला. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तसेच ऋषभ पंतने 27 धावा केल्या. अन्य कोणाला 20 धावांचा

टप्पाही पार करता आला नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तसेच वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कोलकाताने 16.3 षटकात 3 विकेट्स गमावत 157 धावा करत पूर्ण केला. कोलकाताकडून सॉल्टने 33 चेंडूत 68 धावांची खेळी केली.

श्रेयस अय्यरने 23 चेंडूत 33 धावांची आणि वेंकटेश अय्यरने 23 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या, तर लिझाद विल्यम्सने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT