Simon Katich Left SunRisers Hyderabad  esakal
IPL

काव्याच्या SRH चं वॉर्नरनंतर आता कॅटिचबरोबरही वाजलं?

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) आधी कर्णधारपदावरून आणि नंतर संघातून डच्चू दिला. त्यानंतर आता डेव्हिड वॉर्नर (David Warner) दिल्लीवासी झाला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन कॅटिचने (Simon Katich) देखील सनरायजर्स हैदराबादला रामराम ठोकला आहे. स्पर्धा सुरू होण्याला दोन महिने शिल्लक असताना कॅटिचने हैदराबादचा कॅम्प सोडला आहे. 'द ऑस्ट्रेलियन'ने दिलेल्या वृत्तानुसार कॅटिच आणि संघ व्यवस्थापनामध्ये संघ कसा हाताळायचा आणि लिलावापूर्वीच्या (IPL 2022 Auction) प्लॅनिंगला हरताळ फासल्याने सायमन कॅटिचने हा निर्णय घेतला आहे. . यंदाच्या आयपीएल लिलावात सनराजर्सकडून काव्या मारन (Kaviya Maran) ही बोली लावण्यात आघाडीवर होती.

गेल्या हंगामापासून संघातील ट्रेव्हर बेलिस आणि ब्रॅड हेडीन या प्रशिक्षकांनी देखील पद सोडले आहे. येत्या आयपीएल हंगामात सनरायजर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक हे ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी असतील. त्यांनीच सायमन कॅटिचला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सनरायजर्स हैदराबादमध्ये आणले होते. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आयपीएल 2022 मधील हंगामात संघाचे नेतृत्व करणार आहे.

आयपीएलचा मेगा लिलाव गेल्या आठवड्यात पार पडला होता. सनरायजर्सने त्यावेळी एडीन मार्करम आणि मार्को जेनसेन यांना संघात घेतले आहे.

सनरायजर्स हैदराबादचा आयपीएल 2022 साठीचा संपूर्ण संघ:

केन विलयमसन, उमरान मलिक, अब्दुल समाद, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रियाम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीशा सचित, एडीन मार्करम, मार्को जनसेन, रोमारियो शेफर्ड, सैन एबॉट, आर. समर्थ, शशांक सिंह, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलाक फारूकी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT