ipl 2024 news  sakal
IPL

परदेशीच नाही तर... भारतीय खेळाडू देखील सोडणार IPL च्या मध्येच फ्रेंचायझीची साथ; जाणून घ्या कारण

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम खेळला जात आहे. लीगचे संपूर्ण वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले.

Kiran Mahanavar

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम खेळला जात आहे. लीगचे संपूर्ण वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. आणि आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे, तर प्लेऑफ चे सामने 21 मे पासून सुरू होईल. क्वालिफायर-1 21 मे, एलिमिनेटर 22 मे आणि क्वालिफायर-2 24 मे रोजी होणार आहे. यानंतर लवकरच टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होणार आहे.

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील थरार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून रंगणार आहे. अशा परिस्थितीत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सहभागी संघ अमेरिकेला रवाना होतील.

अशा परिस्थितीत, आयपीएल 2024 च्या प्लेऑफ दरम्यान खेळाडू त्यांच्या संबंधित फ्रँचायझी सोडून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी निघून जातील. मात्र, प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करणाऱ्या चार संघांचे खेळाडू ही स्पर्धा संपल्यानंतरच वर्ल्ड कपसाठी उपलब्ध होतील. त्याचबरोबर ज्या संघांचे खेळाडू प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाहीत ते वेळेवर वर्ल्ड कपसाठी रवाना होतील.

टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला 2 सराव सामने खेळायचे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय खेळाडू 27-28 मे रोजी अमेरिकेला रवाना होऊ शकतात. जे खेळाडू प्लेऑफमध्ये प्रवेश करतील अशा संघांचा भाग असतील ते नंतर राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी निघून जातील.

भारतीय संघ पाच जून रोजी टी-20 वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. तसेच 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना पाहायला मिळणार आहे. याशिवाय भारतीय संघाचा सामना गट टप्प्यात अमेरिका (१२ जून) आणि कॅनडा (१५ जून) यांच्याशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

SCROLL FOR NEXT