Gautam Gambhir - Virat Kohli | IPL 2024 Sakal
IPL

Virat Kohli-Gautam Gambhir: एक झप्पी अन् विषय संपला! सामन्यापूर्वी विराट-गंभीरमध्ये रंगली गप्पांची मैफल, पाहा Video

Virat Kohli-Gautam Gambhir Video: केकेआर आणि आरसीबी संघात रविवारी आयपीएलचा सामना रंगणार आहे, या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्याच गप्पा रंगल्या होत्या, याचा व्हिडिओही सध्या चर्चेत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli-Gautam Gambhir Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होणार आहे. रविवारी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्याआधी एक व्हिडिओ समोर आला आहे, तो व्हिडिओ पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे.

या सामन्याच्या एक दिवस आधी कोलकाता नाईट रायडर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाता संघाचा मार्गदर्शक (Mentor) गौतम गंभीर गप्पा मारताना दिसले आहेत.

विशेष म्हणजे थोडी ते एकमेकांशी काहीशी मस्करी करतानाही दिसले आहेत. या व्हिडिओला कोलकाताने कॅप्शन दिलं आहे की 'मिठी मारली अन् विषय संपला. क्रिकेटच्या मैदानात असं दृष्य पाहायला आवडतं.'

खंरतर गंभीर आणि विराट यांना फार चांगले मित्र मानलं जात नाही, कारण त्यांच्यात अनेकदा वादही झाले आहेत. गेल्याच आयपीएल हंगामात गंभीर लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शन असताना त्याच्यात विराटमध्ये सामन्यानंतर कडाक्याचे भांडण झाले होते, ज्यामुळे त्यांना बीसीसीआयच्या दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

मात्र, यानंतर आयपीएल 2024 मध्ये बेंगळुरूला झालेल्या कोलकाता आणि बेंगळुरू सामन्यानंतर या दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली होती. यावेळी या दोघांमधील भांडण मिटल्याचे समजले होते.

यानंतर आता पुन्हा एकदा सामना कोलकाता आणि बेंगळुरू आमने-सामने येण्यापूर्वी हे दोघेही दिल्लीकर एकमेकांशी गप्पा मारताना दिसल्याने त्यांच्यातील वाद संपल्याचे दिसून येत आहे. त्याचमुळे त्यांचे सध्या क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकही होत आहे.

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि बेंगळुरू संघात यापूर्वी बेंगळुरुला झालेल्या सामन्यात कोलकाताने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आता बेंगळुरू या पराभवाचा वचपा काढण्याबरोबरच विजयी मार्गावर येण्यासाठीही प्रयत्नशील असतील.

बेंगळुरूने आत्तापर्यंत 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यातही गेल्या 5 सामन्यात बेंगळुरूने सलग पराभव स्विकारला आहे.

याशिवाय कोलकाताबाबतही सांगायचे झाल्यास कोलकाताने 6 सामन्यांपैकी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT