IPL

IPL 2022: फाफ ड्युप्लेसिसच्या कॅप्टन्सीबाबत 'विराट' प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: विराट कोहलीने (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आरसीबीला आयपीएल 2022 लिलावात कर्णधाराचाही खरेदी करावी लागली होती. दरम्यान, आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज सलामीवीर फाफ ड्युप्लेसिसला (Faf du Plessis) आपल्या गोटात ओढत सलामीवीर आणि कर्णधार (Captain) असे दोन्ही पक्षी एका दगडात मारले.

यापूर्वी विराट कोहली 2013 पासून आरसीबीचा कर्णधार होता. गेल्या वर्षी त्याने आपले कर्णधारपद सोडून दिले होते. आरसीबीने काही दिवसांपूर्वीच फाफ ड्युप्लेसिस हा विराट कोहलीची जागा घेईल असे स्पष्ट केले होते. आरसीबीने चार वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जमधील (Chennai Super Kings) अव्वल खेळाडू 7 कोटी रूपये खर्चून विकत घेतला. आता तोच संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार म्हणून फाफ ड्युप्लेसिसचीच का निवड केली याचा खुलासा केला.

विराट कोहलीने आरसीबीच्या ट्विटर हँडेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले की, 'लिलावात फाफ ड्युप्लेसिसला घेताना आमची रणनिती स्पष्ट होती. आम्हाला अशा एक चांगल्या कर्णधाराची गरज होती. फाफ हा कसोटी संघाचा कर्णधार (Test Captain) होता. याचबरोबर तो एक सन्मानित क्रिकेटर आहे. आरसीबीमध्ये त्याच्या नेतृत्वाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. त्याला त्याचा रोल चांगला माहिती आहे.' कोहली पुढे म्हणाला की, 'आमच्या सर्वांसोबत त्याचे चांगले नाते आहे. मला आशा आहे की मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि इतर सगळे संघ सहकारी त्याच्या नेतृत्वात आयपीएलचा आनंद घेतील. विराट कोहली नुकताच आरसीबीच्या सराव शिबिरात दाखल झाला आहे.

विराट कोहलीने यापूर्वीच सांगितले होते की, त्याने आपल्यावरील वर्कलोडचे (Work Load) व्यवस्थापन करण्यासाठी रॉयल चॅलेंजर बेंगलोरची कॅप्टन्सी सोडली आहे. तो म्हणाला, 'मी आयपीएलचा इतका मोठा प्रवास केला हे अविश्वसनीय आहे. मात्र आता मी नवी उर्जा घेऊन मैदानात उतरणार आहे. कारण माझ्यावरील अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्यातून मी आता मुक्त झालो आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT