IPL

RCB vs DC : 'विराट' सुरूवातीनंतर RCB ढेपाळली, कुलदीप - मार्शसमोर टेकले गुडघे

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 RCB vs DC Live Score : रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यातील सामन्यात आज नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरूवात करूनही दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी ढेपाळल्यामुळे आरसीबीला 20 षटकात 6 बाद 174 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

आरसीबीची स्टार सलामी जोडी फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली यांनी 5 व्या षटकात संघाला 40 धावांच्या पार पोहचवले. मात्र 22 धावांवर ड्युप्लेसिसला बाद करत मिचेल मार्शने ही जोडी फोडली. त्यानंतर विराट कोहली आणि महिपाल लोमरोरने भागीदारी रचण्याच प्रयत्न केला.

विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतकी खेळी करत आरसीबीला 100 च्या जवळ पोहचवले. मात्र ललित यादवने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला दिलासा दिला. यानंतर दिल्लीच्या मिचेल मार्श, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी भेदक मारा करत आरसीबीची मधील फळी फेल केली.

महिपाल 26 तर मॅक्सवेल 24 धावा करून बाद झाला. तर दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. आरसीबीची अवस्था 3 बाद 132 वरून 6 बाद 132 धावा अशी झाली. कुलदीप यादवने 23 धावात 2 बळी टिपले. त्याला मिचेल मार्शने 2 षटकात 2 विकेट घेत चांगली साथ दिली.

यानंतर अनुज रावत आणि शाहबाज अहमदने 42 धावांची भागीदारी रचस संघाला 174 धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT