virat kohli-hilarious-reaction-to-smriti-mandhana-video interview viral-on-internet ipl 2023 cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023: चालू मुलाखतीत विराट कोहलीने केली शिवीगाळ! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

Kiran Mahanavar

IPL 2023 Virat Kohli : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत आरसीबीला दणदणीत विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला गुडघे टेकण्यास भाग पाडले. तसे या खेळीऐवजी आता विराट कोहली इतर कारणांमुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीच्या तोंडून अपशब्द निघाले आहेत.

विराट कोहलीने आरसीबी इनसाइडरवर दिलेल्या मुलाखतीत काहीतरी सांगितले जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही.

अशा परिस्थितीत RCB इनसाइडरमध्ये विराट कोहलीसोबत खास संवाद साधताना अँकर दानिश सेट म्हणाला की, अलीकडेच स्मृती मानधना म्हणाली होती की, विराटने जसे केले आहे तसे तिला आरसीबीसाठी काहीतरी साध्य करायचे आहे.

यानंतर दानिश म्हणाला की मंधाना कदाचित योग्य मार्गावर आहे कारण ती डब्ल्यूपीएलमध्ये फक्त दोन सामने जिंकू शकली आहे. या प्रश्नानंतर विराट कोहली हसला आणि असं काही बोलला की बीप वाजवावं लागलं. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

आरसीबीचा संघ नेहमीच मजबूत राहिला आहे यात शंका नाही. गेल्या तीन हंगामात या संघाने प्लेऑफमध्ये धडक मारली असली तरी प्रत्येक वेळी या संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. आरसीबी प्रत्येक मोसमात जेतेपदाचा मोठा दावेदार मानला जातो, यावेळीही तोच आहे.

बंगळुरूने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन मुंबईला पराभूत करून चांगली सुरुवात केली आहे, पण आयपीएलसारख्या स्पर्धेत सुरुवातीपेक्षा तुमचा शेवट कसा होतो हे महत्त्वाचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT