Why Rajasthan Royals Retired Out Ravichandran Ashwin
Why Rajasthan Royals Retired Out Ravichandran Ashwin  ESAKAL
IPL

सेट झालेला राजस्थानचा अश्विन का झाला 'रिटायर्ड आऊट'?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) यांच्यातील आयपीएल सामन्यात आज एक अजब प्रकार घडला. राजस्थान रॉयल्सने 19 वे षटक सुरू असताना अचानक 23 चेंडूत 28 धावा करणाऱ्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) रिटायर्ड आऊट (Retired Out) होऊन बाहेर गेला. विशेष म्हणजे शिमरॉन हेटमायर आणि अश्विन चांगली फलंदाजी करत होते. त्यामुळे अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वच चाहते गोंधळले. अश्विन हा आयपीएल इतिहासातला रिटायर्ड आऊट होणारा पहिला फलंदाज ठरला.

राजस्थान बॅटिंग करत असताना त्यांची अवस्था 4 बाद 67 धावा अशी बिकट झाली होती. मात्र त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि आर. अश्विन यांनी डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 धावांची दमदार भागीदारी रचली. विशेष म्हणजे राजस्थानने रियान पराग आणि कुलदीप सेन यांच्या आधी अश्विनला पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र राजस्थानच्या फलंदाजीला लागलेली गळती थांबवण्यासाठी आर. अश्विनच्या रूपाने 'एम सील' वापले होते. या एम सीलने राजस्थानची गळती प्रभावीपणे रोखली. मात्र त्यानंतर राजस्थानच्या अश्विनने 18.2 षटकात आपली रणनिती बदलली.

आर. अश्विनला रिटायर्ड आऊट होऊन माघारी गेला. या अजब निर्णयामुळे चाहते गोंधळले. मात्र राजस्थानने शेवटचे काही चेंडू शिल्लक राहिल्याने त्यांचा चांगला स्ट्राईकर फलंदाज रियान परागला (Ryan Parag) हेटमायरच्या जोडीने आक्रमक फटके मारण्यासाठी पाठवले. शेमरॉन हेटमायरने 36 चेंडूत नाबाद 56 धावा चोपल्या. त्यात 6 षटकारांचाही समावेश आहे. अश्विनला रिटायर करून फलंदाजीला पाठवलेल्या रियानने 4 चेंडूत 8 धावा केल्या. त्याला एकच षटकार मारता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT