Irani Cup 2022 sakal
क्रीडा

Irani Cup 2022 : आजपासून इराणी करंडकाला सुरुवात; सर्वांच्या नजरा चेतेश्वर पुजारावर

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील महत्वाची स्पर्धा असणाऱ्या इराणी करंडकाचा सामना आजपासून राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळविला जाणार

सकाळ वृत्तसेवा

राजकोट: देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील महत्वाची स्पर्धा असणाऱ्या इराणी करंडकाचा सामना आजपासून राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळविला जाणार आहे. सौराष्ट्र विरुद्ध शेष भारत यांच्यात होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा भारताच्या कसोटी संघातील दिग्गज फलंदाज आणि सध्या धावा काढण्यासाठी झगडणाऱ्या चेतेश्वर पुजारावर असतील. आगामी बांग्लादेशच्या कसोटी दौऱ्याचा पार्श्वभूमीवर इराणी करंडकाचा सामना पुजारासाठी महत्वाचा ठरणार आहे. या वर्षीच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने चांगली कामिगिरी केली आहे. सौराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या खांद्यावर असेल ; तर शेषभारताचा कर्णधार हनुमा विहारी असेल. सौराष्ट्राच्या संघ हा २०१९-२० च्या रणजी मौसमाचा विजेता संघ आहे. मात्र गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने इराणी करंडक खेळविण्यात आला नव्हता.

इराणी करंडकासाठी संघ पुढील प्रमाणे:

१) सौराष्ट्र: जयदेव उनाडकट ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा,शेल्डन जॅक्सन, अर्पित वसावडा, चिराग जानी, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, प्रेरक मंकड, चेतन सकारिया, स्नेल पटेल, विश्वराजसिंह जडेजा, कुशांग पटेल, हार्वीक देसाई, समर्थ व्यास, पार्थ भुट, किशन परमार.

२) शेष भारत : हनुमा विहारी ( कर्णधार), मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभूमन्यू ईश्वरन, यश धूल, सर्फराझ खान, यशस्वी जैसवाल, के.एस.भारत, उपेंद्र यादव, जयंत यादव, सौरभ कुमार, आर.साई. किशोर, मुकेश कुमार, उम्रान मलिक, कुलदीप सेन,अरझान नागवासवाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

"काम करणारे लोक भिकारी नाहीत.." मानधन बुडवणाऱ्या निर्मात्यांवर संतापली निळू फुलेंची लेक

'धुरंधर'मधील 'तो' डान्स नाही, तर १००० वर्षांचा वारसा; वाचा या थक्क करणाऱ्या परंपरेमागचा खरा इतिहास!

SCROLL FOR NEXT