ireland vs india
ireland vs india सकाळ
क्रीडा

मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पहिल्या विजयानंतर हार्दिक...

सकाळ ऑनलाईन टीम

ireland vs india: पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या तयारीत आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात जे मनात होते ते सगळे घडले, असे मत कर्णधार हार्दिक पंड्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने आयर्लंड संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात सहज पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील प्रत्येक संघाची 8 षटके पंचांना कापावी लागली. या निराशेपेक्षा 12-12 षटकांचा सामना झाला. याचा प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आणि संयोजकांनी सुटकेचा श्वास सोडला. सामन्यातील कामगिरीवरून ‘सकाळ’ने कप्तान हार्दिक पंड्याबरोबर संवाद साधला असता तो पहिल्या सामन्यातील खेळावरून समाधानी दिसला.

आयपीएलविजेता कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथमच देशाचे नेतृत्व केले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला. या पहिल्या सामन्याबाबत बोलताना हार्दिक म्हणाला, दोन वेळा जोरदार पाऊस आला. संयोजकांची पळापळ झाली. पाऊस थांबला नाही तर सामनाच होणार नाही असे विचारही मनात येऊन गेले. सुदैवाने पाऊस थांबला आणि सामना चालू झाला. प्रेक्षकांचा उत्साह बघता सामना होणे गरजेचे होते, असे हार्दिक पंड्या म्हणाला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला, कारण खेळपट्टी नक्की कशी आहे याचा पूर्ण अंदाज लागत नव्हता. खेळाच्या सुरुवातीला चेंडू किंचित थांबून येत होता. नंतर खेळपट्टी फलंदाजीकरता मस्त झाली. भुवनेश्वर कुमारने चांगली सुरुवात करून दिल्यावर सगळे सुरळीत घडत गेले. मान्य आहे, की मी, उमरान मलिक आणि आवेश खानकडून चेंडूची दिशा अगदी बरोबर नव्हती. भुवनेश्वर आणि चहलचा अनुभव, कौशल्य उपयोगात आले. उमरानला पदार्पण करता आले हे माझ्याकरता फार महत्त्वाचे होते. लक्षात घ्या, पदार्पण एकदाच होत असते. भारतीय संघाची मानाची टोपी मिळणे हे कष्टाचे, भाग्याचे लक्षण असते. त्यामुळे त्याचा आनंद घ्या. त्याचा मारा कसा झाला याची जास्त चर्चा करू नका, हार्दिक पंड्या म्हणाला.

हार्दिककडून बॅट भेट

पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या 22 वर्षीय हॅरी टॅक्टरने आक्रमक फलंदाजीची चांगलीच चुणूक दाखवली. त्याच्या फटक्यात टायमिंग होते तसे ताकदही होती. घणाघाती फटकेबाजी करून त्याने केलेल्या 64 धावांच्या खेळीने प्रेक्षक आनंदी झाले, तसेच हार्दिक पंड्याही प्रभावित झाला. सामन्यानंतर हार्दिकने स्वत:हून जाऊन हॅरी टॅक्टरचे कौतुक केले. इतकेच नाही, तर आपली एक नवी कोरी बॅटही हॅरी टॅक्टरला प्रेमाने भेट म्हणून दिली आणि तरुण हॅरी टॅक्टर भारावून गेला.

आज दुसरा सामना

एकाच दिवसाच्या विश्रांतीनंतर लगेच मंगळवारी दुसरा सामना होणार आहे. मंगळवारचे डब्लिनचे हवामान चांगले राहणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांना आनंदी करत आहे. ज्या क्रिकेट चाहत्यांना रविवारच्या सामन्याची तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी कामाची सुट्टी टाकून मंगळवारची तिकिटे काढली आहेत. कामाचा दिवस असूनही दुसऱ्या सामन्याची तिकिटेही पूर्ण विकली गेल्याने संयोजक खूश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT