Ishan Kishan Irfan Pathan esakal
क्रीडा

Ishan Kishan Irfan Pathan : सराव करण्यासाठी तंदुरूस्त मात्र... इरफान पठाणने वर्मावरच बोट ठेवलं

Ishan Kishan Irfan Pathan : आकाश चोप्रानंतर आता इरफान पठाणच्या देखील इशान किशनला कानपिचक्या

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Kishan Irfan Pathan IND vs ENG : बीसीसीआयने नुकतेच भारतीय संघाची घोषणा केली. इंग्लंडविरूद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 18 खेळाडूंचा भारतीय संघ घोषित केला आहे. या संघात इशान किशनला पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही. इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेनंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्याने मानसिक थकवा आल्याचे कारण दिलं होतं.

इशान किशनचा विचार सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी देखील झालेला नाही. त्यावर प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केलं होतं की इशान किशनला स्वतःला उपलब्ध करून देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल मग त्याचा निवडीसाठी विचार केला जाईल. दरम्यान, किशन सराव करत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आलं होतं. त्यावर इरफान पठाणने त्याचे नाव न घेता चिमटा काढला.

इशान किशनचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो बडोद्यातील किरण मोरे अकॅडमीत सराव करताना दिसला होता. या व्हिडिओवरून किशनने राहुल द्रविडचा सल्ला मानला नसल्याची चर्चा सुरू होती. त्याने झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळणे टाळले आहे.

हाच धागा पकडून इरफान पठाणने ट्विटरवर एक पोस्ट लिहीत इशान किशनवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. इशान किशनचं नाव न घेता पठाणने ट्विट केलं की, ' हे खूप गोंधळात टाकणारं आहे. एखादा खेळाडू सराव करण्याइतपत फिट असतो मात्र देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्याइतपत फिट कसा काय नसतो. याचा आपण अर्थ कसा लावायचा?'

यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने देखील इशान किशनबाबत वक्तव्य केलं होतं. जोपर्यंत इशान किशन देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत त्याला संघात निवडलं जाणार नाही असं आकाश चोप्रा म्हणाला होता.

आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'राहुल द्रविड जे म्हणाला ते अत्यंत योग्य आहे. राहुल द्रविड म्हणाला होता की आधी त्याने स्वतःला निवडीसाठी उपलब्ध केलं पाहिजे, त्याला क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तो क्रिकेट न खेळताच भारतीय संघात निवडला जाईल असं होणार नाही. जर तो काळ जून - जुलै दरम्यान असता तर ठिक होतं.'

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'सध्या रणजी ट्रॉफीचे सामने होत आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट सुरू आहे. इशान किशनने तिथे खेळून तो निवडीसाठी उपलब्ध असल्याचं दाखवून द्यावं लागेल. विशेष म्हणजे तो फोन देखील उचलत नाहीये आणि तो उपलब्ध असल्याचं सांगत नाहीये.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १७ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Latest Marathi News Live Updates: कृषी विभागाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

SCROLL FOR NEXT