Ishan Kishan 
क्रीडा

Ishan Kishan : सिलेक्टर करणार होते कर्णधार, खेळण्यास दिला नकार आता इंडिजविरुद्धच्या मालिकेतूनही जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

Ishan Kishan : 2021-23च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचे 10 वर्षांनंतरचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे.

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली, त्यात ईशान किशनचा समावेश आहे. मात्र या सामन्यात ईशानला खेळण्याची संधी मिळाली नाही. केएस भरतने यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ईशान भारतीय संघात होता, पण त्याला येथेही एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याच्या जागी केएस भरतची निवड करण्यात आली होती, पण त्याच्या खराब कामगिरीमुळे भरतने निराशा केली.

अशा परिस्थितीत केएस भरतवरही प्रश्न उपस्थित केले जात असून पुढील महिन्यात भरतला वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. भरतच्या जागी ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या दरम्यान ईशानने दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ईशानला त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याची आणि कसोटी संघात पंतच्या जागी उदयास येण्याची चांगली संधी होती. मात्र ईशानने देशांतर्गत स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत निवडकर्ते दुसरा पर्याय पाहू शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईस्ट झोन निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, त्यांनी ईशान किशनची निवड करू शकतात का, असे त्यांनी झोन ​​कमिटीला विचारले होते, परंतु ईशान किशनने दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्याचे समजले. त्याच्या या निर्णयानंतर सलामीवीर अभिमन्यू इसवरनची पूर्व विभागाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ईशान हा भारताचा नियमित खेळाडू होता, त्यामुळे त्याला कर्णधारपद मिळू शकले असते, असे निवडकर्त्याने सांगितले. यादरम्यान आम्ही त्याच्याशी फोनवर बोललो पण त्याने सांगितले की त्याला दुलीप ट्रॉफी खेळायची नाही.

ईशानने 2021 साली भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले तोपर्यंत त्याने 48 प्रथम श्रेणी सामने खेळले होते, 38.76 च्या सरासरीने 2985 धावा केल्या होत्या.

अशा परिस्थितीत जर तो दुलीप करंडक खेळला असता तर कदाचित त्याचा आत्मविश्वास वाढला असता आणि अशा स्थितीत तो कसोटी संघातही आपले स्थान पक्के करू शकला असता, पण आता त्याने खेळण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात त्याचा समावेश होणार की निवड समिती इतर पर्याय पाहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT