Ishan Kishan
Ishan Kishan sakal
क्रीडा

Ishan Kishan : ‘गायब’ इशान किशनचा ‘शोध' ; ...तर भारतीय संघासाठी विचार करू,द्रविड

सकाळ वृत्तसेवा

विशाखापट्टणम् : कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास आपण पुन्हा कधी सुरुवात करायचे हे इशान किशनने ठरवायचे आहे, तसे केल्यावरच आम्ही त्याचा भारतीय संघासाठी विचार करू शकतो, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.

इशान किशन डिसेंबरमधील दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावरून क्रिकेटमधून ‘गायब’ झालेला आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेततही तो त्याच्या झारखंड संघातूनही खेळत नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत द्रविड यांना इशान किशनबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

प्रत्येकाला संधी मिळत असते, मी त्याच्याबाबतीत सकारात्मक आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावर त्याने विश्रांती मागितली, ती आम्ही त्याला दिली; परंतु आता तो देशाकडून खेळण्यास सज्ज होत असेल तर त्याने प्रथम कोणत्या तरी प्रकारचे क्रिकेट खेळले पाहिजे, असे द्रविड म्हणाले.

भरतची गच्छंती ?

इशान किशनने विश्रांतीची मागणी करून संघाबाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरतला संधी मिळाली; परंतु फलंदाजीत त्याने दोन्ही कसोटीत निराशा केली आहे. पुढच्या कसोटीत त्याला वगळणे जाणे अपेक्षित आहे. भरतच्या यष्टीरक्षणावर द्रविड यांनी समाधान व्यक्त केले; परंतु त्याच्या फलंदाजीबाबत अधिक वक्तव्य केले नाही. नवोदित खेळाडूंना प्रगती करायला थोडा वेळ लागतोच; परंतु संधीचा फायदाही घ्यायचा असतो, असेही द्रविड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT