Jasprit Bumrah IND vs IRE esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : आयपीएलचा फायदा... माझ्या पुनरागमनाचं श्रेय... जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर कोणाचे मानले आभार?

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah IND vs IRE : भारताने आयर्लंडविरूद्धचा पहिला टी 20 सामना 2 धावांनी जिंकला. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल देण्यात आला. मात्र या सामन्यात भारताच्या दोन गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले.

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात 2 विकेट घेतल्या. त्याने चांगल्या वेगाने गोलंदाजी करत आपला फिटनेस सिद्ध केला. याचबरोबर प्रसिद्ध कृष्णाने देखील झोकात टी 20 पदार्पण केले.

जसप्रीत बुमराहने जवळपास 11 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पाठीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याने बराच काळ एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करण्यात घालवला. बुमराह गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 ला देखील मुकला होता. सामना झाल्यानंतर बुमराहने या कठिण काळाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

सामना झाल्यानंतरच्या कार्यक्रमात बोलताना बुमराह म्हणाला की, 'मी पदार्पणावेळी तणावत नव्हतो तर मला आनंद झाला होता.' तो पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही कर्णधार असता त्यावेळी तुम्ही तुमच्या कामगिरीपेक्षा इतरांचा जास्त विचार करत असता.'

'मला खूप चांगलं वाटत आहे. मी एनसीएमध्ये अनेक सेशनमध्ये गोलंदाजी केली. मी खूप काही मिस करतोय किंवा काही नवीन करतोय असं वाटलं नाही. याचे सर्व श्रेय हे एनसीएच्या स्टाफला जाते. त्यांनी मला चांगल्या मानसिकतेत ठेवले.'

सामन्यावेळी मिळालेल्या पाठिंब्याबाबत बोलताना बुमराह म्हणाला की, 'मला असं वाटतं की आयपीएलचा फायदा होतोय. तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला पाठिंबा देणारे लोक भेटतात, तुमचा उत्साह वाढवतात हे खूप चांगले आहे.'

सामन्याबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, 'सुरूवातीला चेंडू स्विंग होत होता. त्याचा आम्ही फायदा उचलण्याचा निर्णय घेतला. आम्ही नाणेफेक जिंकली, वातावरणामुळे आम्हाला मदत मिळाली. तुम्ही प्रत्येक सामन्यात अजून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असता. त्यांनी देखील चांगली कामगिरी केली. पडझडीनंतर त्यांनी चांगले पुनरागमन केले. याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT