Jaydev Unadkat ODI esakal
क्रीडा

Jaydev Unadkat ODI : हार्दिक पांड्याच्या एका निर्णयाने तब्बल 3540 दिवसांचा दुष्काळ संपला

अनिरुद्ध संकपाळ

Jaydev Unadkat ODI : भारतीय संघाने विंडीज दौऱ्यावरील वनडे मालिकेत तीन सामन्यात सातत्याने संघात बदल केले आहेत. या मालिकेत भारतीय संघाने वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून आपल्या संपूर्ण बेंच स्ट्रेंथला खेळण्याची संधी देत आपले कॉम्बिनेशन चाचपून पाहिले.

विंडीजसोबतची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत असताना, मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात देखील भारतीय संघाने प्रयोग केले.

यावेळी बऱ्याच काळापासून संधी न मिळालेल्या ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकटला संधी दिली. जयदेव उनाडकटने तर 9 वर्षे आणि 11 दिवसांनी वनडे संघात परतला आहे.

तब्बल 3540 दिवसांनी संधी

जयदेव उनडाकडे भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 2013 मध्ये पदार्पण केले होते. त्याने झिम्बाब्वेविरूद्ध आपला पदार्पणचा सामन खेळला होता. त्यानंतर त्याच वर्षी त्याने वेस्ट इंडीज विरूद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळला. यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी जवळपास 10 वर्षे वाट पहावी लागली.

जयदेव उनाडकट याच्या दोन वनडेमधील गॅप हा जवळाप 3540 दिवसांचा झाला आहे. भारताकडून दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट वनडे सामन्यात सर्वात मोठा गॅप राहिलेल्याच्या यादीत जयदेव उनडाकटने अव्वल स्थान पटकावले आहे. जयदेव उनाडकटच्या दोन वनडे सामन्यांच्या गॅपमध्ये भारतीय संघाने 193 सामने खेळले आहेत.

या पूर्वी हा विक्रम रॉबिन सिंहच्या नावावर होते. त्याने 7 वर्षे 230 दिवसांच्या गॅपनंतर वनडे सामना खेळला होता. वनडेमध्ये सर्वाधिक मोठ्या गॅपनंतर वनडे सामना खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या जेफ विल्सनच्या नावावर आहे. त्याचा दोन वनडे सामन्यातील गॅप हा तब्बल 11 वर्षे 331 दिवस इतका होता.

कसोटीतही एक तप पाहिली वाट

जयदेव उनाडकटचा दोन कसोटी सामन्यातील देखील एका तपाचा म्हणजे 12 वर्षे 2 दिवसाचा गॅप होता. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याला त्यानंतर त्याचा पुढचा कसोटी सामना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

ICC Test Rankings: एकाच सामन्यात ४३० धावा करणाऱ्या शुभमन गिलची गरुडझेप; रुटला मागे टाकत संघसहकाऱ्यानं पटकावला अव्वल क्रमांक

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

SCROLL FOR NEXT