Jaydev Unadkat County Cricket esakal
क्रीडा

Jaydev Unadkat : W, W, W, W, W, W... पृथ्वीनंतर आता जयदेवने इंग्लंडला लावलं वेड; लीस्टरशायरच्या तोंडचा घास पळवला

अनिरुद्ध संकपाळ

Jaydev Unadkat County Cricket : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाटकडने इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये मोठा धमाका केला आहे. त्याने एका सामन्यात 9 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली. काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना लीस्टरशायरविरूद्ध जयदेवने ही भारी कामगिरी केली. त्याने संपूर्ण सामन्यात 9 विकेट्स घेतल्या अन् ससेक्सला सामना 15 धावांनी जिंकून दिला.

लीस्टरशायरच्या तोंडचा घास पळवला

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर लीस्टरशायरची सामन्यावर चांगली पकड होती. मात्र उनाडकटने प्रतिस्पर्धी संघाचे शेवटचे 4 फलंदाज 30 धावात गारद केले. यामुळे लीस्टरशायरच्या हातून सामना निसटला.

ससेक्सने लीस्टरशायरसमोर विजयासाठी 499 धावांचे आव्हान ठेवले होते. लीस्टरशायरने 6 विकेट्स गमावून 450 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर उनाडकटने आपल्या स्पेलमध्ये 30 धावा देत लीस्टरशायरच्या उरलेल्या 4 विकेट्स घेतल्या.

जयदेव उनाडटकटने संपूर्ण सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या डावात 12.4 षटकात 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 32.4 षटके गोलंदाजी करत 94 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या. उनाडकटबरोबरच जॅक कर्सन आणि कार्वेलस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेल्या. कार्वेलसने पहिल्या डावात देखील 4 विकेट्स घेतल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT